भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरूवात केली असून या लेखात आपण पाहणार आहोत "पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे. त्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.
भारत सरकारने काढलेल्या परीपत्रकानुसार भारतामध्ये सुमारे 6.95 कोटी शेतकरी हे किसान क्रेडिट कार्ड वापरत असल्याचे समजते परंतु अनेक शेतकरी हे या किसान क्रेडिट कार्ड वापरत असताना सुध्दा कर्जापासून वंचीत आहेत. त्यामूळे अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ व्हावा या दृष्टीने सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सगळ्या लाभार्थ्यांचा केसीसी योजनेत समावेश करण्याची मोहीम हाती घेतली.
या मोहीमेंतर्गत जास्तीज जास्त शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ व्हावा यासाठी केंद्र शासनाने PM Kisan या वेबसाईट वर किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरू केली.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं.
केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ होतो.
शेतकऱ्यांकडून ५० रुपये शुल्क CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडून आकारलं जातं.
जर तुमच्याकडे CSC सेंटरचा आयडी असेल तर खालील लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता.
त्यानंतर KCC ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंट काढून घ्या. ती प्रिंट घेऊन बँक मध्ये किसान क्रेडिट कार्ड संदर्भात चौकशी करा.
हेही वाचा - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021 यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा
0 Comments