व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे, हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जरी व्यक्तीचे रेशनकार्ड, मतदानकार्ड, आधारकार्ड, ही कागदपत्रे व्यक्ती राहत असलेल्या ठिकाण दर्शवत असले तरी रहिवासी प्रमाणपत्र हे रहिवासी दर्शवणारे प्रमाणित अंतिम प्रमाणपत्र असते.
लायसेन्स, नोकरी, संपत्ती, व्यवसाय नोदणी इ.साठी याची आवश्यकता असते.रहिवासी प्रमाणपत्र हे केवळ प्रत्येक राज्य तेथील राहणाऱ्या नागरिकांना देत असल्याने एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र काढण्यास पात्र नसतो, तसे करणे कायद्याने गुन्हा ठरतो.
रहिवासी प्रमाणपत्रामध्ये गाव पातळीवर तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र मराठी मध्ये तहसील कार्यालयाकडून दिले जाणारे डोमोसाईल / रहिवासी प्रमाणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयातून /मार्फत दिले जाणारे राष्ट्रियत्व प्रमाणपत्र असे कामानुसार प्रमाणपत्र वापरता येतात.केंद्रीय नोकर भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीकरिता डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यकता असते. मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे.
रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती:
रहिवासी दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
रहिवासी दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावे लागेल, नोंदणी झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
हेही वाचा - ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला "महसूल विभाग" हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर उप विभाग यामध्ये "महसूल सेवा "या पर्यायावर क्लिक करा.
हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये शेतकरी असल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील "तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र" या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
नंतर महाऑनलाईन विभागाची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये "तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र " या पर्यायावर क्लिक करायचे आहे,
यानंतर तात्पुरता रहिवास प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे हे पेज ओपन होईल.
रहिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
ओळखीचा पुरावा (किमान -1)
1) पारपत्र
2) आधार कार्ड
3) मतदाता ओळखपत्र
4) अर्जदाराचा फोटो
5) निमशासकीय ओळखपत्र
6) आर एस बी वाय कार्ड
7) म्रारोहयो जोब कार्ड
8) वाहन चालक अनुज्ञप्ती
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
1) पारपत्र
2) वीज देयक
3) भाडे पावती
4) आधार कार्ड
5) दूरध्वनी देयक
6) पाणीपट्टी पावती
7) मालमत्ता कर पावती
8) मतदार यादीचा उतारा
9) वाहन चालक अनुज्ञप्ती
10) मालमत्ता नोंदणी उतारा
11) ७/१२ आणी ८ अ चा उतारा
इतर दस्तऐवज (किमान -1)
1) वीज देयक
2) भाडेपावती
3) शिधापत्रिका
4) दूरध्वनी देयक
5) विवाहाचा दाखला
6) पाणीपट्टी पावती
7) मालमत्ता करपावती
8) मतदार यादीचा उतारा
9) मालमत्ता नोंदणी उतारा
10) ७/१२ आणि ८ अ चा उतारा
11) पतीच्या रहिवासाचा दाखला
वयाचा पुरावा (किमान -1)
1) जन्माचा दाखला
2) बोनाफाईड प्रमाणपत्र
3) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
4) सेवा पुस्तिका (शासकीय / निम - शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा (किमान -1)
1) रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला
2) रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
3) रहिवास पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला
अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)
1) इतर
2) स्वघोष्णापत्र
वरील आवश्यक कागदपत्रे पहा आणि नंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर रहिवासी दाखला हे पेज ओपन होईल, त्या पेजमध्ये तुम्हाला अर्जामध्ये दाखविल्याप्रमाणे माहिती भरायची आहे.
प्रमाणपत्राचे नाव: यामध्ये रहिवासी दाखला निवडायचे आहे.
अर्जदाराचा वैयक्तिक तपशिल: यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती भरायची आहे.
- अर्जदाराच्या निवासाचा तपशिल: यामध्ये अर्जदाराच्या पत्त्याचा तपशील टाकायचा आहे.
- लाभार्थ्याशी नाते: यामध्ये जो लाभार्थी आहे त्याची पूर्ण माहिती टाकायची आहे.
- जन्माचे तपशील: यामध्ये होय किंवा नाही याची निवड करायची आहे.
- लाभार्थीची शैक्षणिक माहिती: यामध्ये लाभार्त्याची शैक्षणिक माहिती टाकायची आहे.
- अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला असल्यास (लागू आहे/नाही): यामध्ये होय किंवा नाही याची निवड करायची आहे.
- अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे काय ? असल्यास ठिकाणाचा तपशील: यामध्ये हो किंवा नाही याची निवड करायची आहे.
- प्रमाणपत्र: यामध्ये रहिवासी दाखला कोणत्या कारणासाठी पाहिजे याचे सविस्तर विवरण करायचे आहे.
- त्यानंतर कराराचा तपशील वाचून "मला मंजूर" या पर्यायावरती क्लिक करून "समावेश करा" यावरती क्लिक करा.
- समावेश करा या वर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज नंबर मिळेल. पुढे तुम्हाला फोटो आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत.
हेही वाचा - जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!
0 Comments