आपले सरकार पोर्टलवर नवीन युजर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती – (Aaple Sarkar New User Register)
सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठी लांब रांगा टाळून, आपल्या सोयीनुसार ‘आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.
या लेखा मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया:
आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे वेबसाईट ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, मराठी भाषेचा पर्याय निवडा.
आता “नवीन युजर? येथे नोंदणी करा” (“New User? Register Here) या पर्यायावर क्लिक करा.
आता पुढे दोन पर्याय दिसतील त्यामध्ये आपण इथे नवीन युजर नोंदणी करण्यासाठी पहिला पर्याय निवडणार आहोत.
- आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा.
- स्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा.
भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी:
आता हिथे तुमचा जिल्हा निवडून मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक OPT येईल तो One Time Password (OTP) बॉक्स मध्ये टाईप करा आणि युजरनेम पर्यायामध्ये युजरनेम टाका, नंतर पुढे तुम्हला पासववर्ड सेट करायला येईल तिथे पासवर्ड टाका.
सूचना: पासवर्ड 0 ते 9 पर्यंतच्या एका अंकात, संख्येच्या आणि लिपीच्या संख्येनुसार / अक्षराचा समावेश असला तरी, क्रमांक # $% ‘ज्याठिकाणी विशिष्ट भाग समाविष्ट असतो आणि पासवर्ड संख्येमध्ये 7 आणि कमाल 20 वर्णांचा समावेश असतो. उदाहरण- Citizen@123
वरील प्रोसेस झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर युजरनेम येईल, ते युजरनेम आणि तुम्ही सेट केलेला पासववर्ड टाईप करून तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
लॉगिन झाल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला पाहिजे त्या सेवेचा पर्याय निवडून अर्ज करायचा आहे.
हेही वाचा – शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!