नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना

हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना

पोकरा अनुदान योजना- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खालील विविध पोकरा अनुदान योजना राबवल्या जातात. 

१) पंप संच व पाईप अनुदान योजना:

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी यापूर्वी विविध योजनामधून अनुदानावर संरक्षित सिंचन सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता या उपघटकांतर्गत पाणी उपसा साधने (पंप संच) व पाईप (एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी.) हे वैयक्तिक लाभाचे घटक राबववणे प्रस्तावित आहे.

पंप संच व पाईप अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

२) परसातील कुक्कुटपालन योजना:

कुक्कुटपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना व भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना हमखास पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे.

उद्देश:

1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहामधील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविणे.

2. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.

3. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळावी व लाभार्थी कुटुंबाना प्रथिनेयुक्त आहार मिळावा.

परसातील कुक्कुटपालन योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

३) नवीन विहीर योजना:

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा अंतर्गत) नवीन विहीरी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेत ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी सहभागी होऊ शकतात. 

आवश्यक कागदपत्रे: सातबारा (7/12) व 8अ उतारा

नवीन विहीर योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

४) विहीर पुनर्भरण योजना:

जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा. धरणे, शेततळी, तलाव इत्यादी तसेच पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण, औद्योगिकीकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिकरीत्याही भूजल पुनर्भरण कमी होणे , दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा कारणांमुळे भूजलपातळी खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहेच, सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.

विहीर पुनर्भरण योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

५) गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजना:

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरी, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक/सामुदायिक शेततळी याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते. उपलब्ध सिंचनस्तोताचा पिकांसाठी संरक्षित सिंचनाबरोबर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करण्यासाठी वापर केल्यास, शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत एकात्मिक शेती पद्धती (A2.5) या घटकांतर्गत शेत तळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (A5.5) हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

६) हरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजना:

फलोत्पादन क्षेत्रात संरक्षित शेती पध्दतीचा अवलंब केल्याने फुलपिके व भाजीपाला पिकाचे अधिक उत्पादन, उत्पादकता व उच्च दर्जाचे उत्पादन मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. फुलपिके ,भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे योग्य गुणवतेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये अधिक चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतात.

हरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

७) मधुमक्षिका पालन योजना:

मधमाशांचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध एकत्रित करून तो बाटल्यात भरून विकला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्यातून वर्षाकाठी ५० हजार ते ६० हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो. मध हे एक शक्तिदायक, पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशांचे मेण हे सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. केवळ मध व मेणासाठीच नव्हे तर मधमाशांकडून होणाऱ्या परागीकरणामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.

त्यामुळे प्रकल्प क्षेत्रामध्ये मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून  देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत “मधुमक्षिका पालन ” या घटकाचा समावेश करण्यात  आलेला आहे.

मधुमक्षिका पालन योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

८) गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजना:

सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे , पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे, रासायनिक खते, कीटकनाशके ,तणनाशके व संप्रेरके या सारख्या घातक रसायनांचा पर्यायी अशा सेंद्रिय व जैविक निविष्ठाचा वापर वाढविणे हि काळाची गरज आहे. गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्ट हे शेतीतील काडी कचरा,वनस्पतीजन्य पदार्थ ,शेण यांच्यापासून गांडुळादवारे बनविले जाते. गांडूळ खतामध्ये विविध जिवाणू ,संजीवके व्हिटॅमिन आणि इतर उपयुक्त रसायने गांडूळ खतामध्ये असल्याने त्याच्या पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो .

याच बरोबर शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारा प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने ,सूक्ष्म जीव तसेच गांडुळादवारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात केला गेल्यास जमिनीचे आरोग्यात विशेष सुधारणा होऊन, कृषी उत्पादनात फार मोठी भर पडेल. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत तयार करून,परत शेतात टाकणे हि काळाची गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढून पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. या अनुषंगाने सदरची बाब विचारात घेऊन गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविणे प्रस्तावित आहे.

गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

९) शेततळे योजना:

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा अंतर्गत) शेततळे अनुदान योजने मध्ये खालील घटक  सहभागी होऊ शकतात.        

(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                                               

(2) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.

 शेततळे योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

१०) रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना:

प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत रुंद वाफा व सरी (बीबीएफ) हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा, तांत्रिक साहित्य इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. शेतीशाळा या माध्यमातून खरीप हंगामात गावांमध्ये रुंद वाफा व सरी या पद्धतीने बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी केलेली आढळून आलेली आहे. सदर तंत्रज्ञान अवलंब करताना काही अडचणी देखील येत असल्याबाबत प्रक्षेत्र भेटीमध्ये शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यामध्ये बीबीएफ यंत्राची उपलब्धता, बीबीएफ यंत्र वापरणेबाबत कौशल्य, बीबीएफ यंत्राची किंमत, बीबीएफ यंत्राची जोडणी, यंत्राची देखमाल इ. बाबी समाविष्ट आहेत. तथापि सदर तंत्राची उपयुक्तता लक्षात घेता त्याचा अवलंब वाढवणे क्रमप्राप्त आहे  त्यासाठी सदर उपक्रम प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. 

रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

PoCRA योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची  गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन करण्यात आले.


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments