परसातील कुक्कुटपालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
आपण या लेखात परसातील (Parsatil Kukkutpalan Yojana) कुक्कुटपालन योजनेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-र्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
परसातील कुक्कुटपालन योजना – Parsatil Kukkutpalan Yojana:
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. कुक्कुटपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील परसातील (Parsatil Kukkutpalan Yojana) कुक्कुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना व भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना हमखास पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे.
परसातील कुक्कुटपालन योजनेचा उद्देश:
1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहामधील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविणे.
2. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
3. ग्रामीण भागातील परसातील (Parsatil Kukkutpalan Yojana) कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळावी व लाभार्थी कुटुंबाना प्रथिनेयुक्त आहार मिळावा.
लाभार्थी निवडीचे निकष:
प्रकल्पाांतर्गत निवड केलेल्या गावातील ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा , परितक्त्या महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकरी यांना लाभ देय राहील.
अर्थसहाय्य:
सदर देशी वाणांच्या कोंबडीची चार आठवडे वयाची पिल्ले घेणे अभिप्रेत आहे. चार आठवडे वयाच्या पिलाची रक्कम रु. 100/- प्रती पक्षी मर्यादेत निर्धारित करणेत येत आहे. एका पिलाच्या निवाऱ्यासाठी 1 चौ.फुट जागा आवश्यक आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १०० पक्षांसाठी अर्थसहाय्य देय आहे. जुने पक्षी असतील तर जुने व नवीन मिळून एकूण १०० पक्षी होतील या मर्यादेपर्यत नवीन पक्षांची खरेदी करता येईल. नव्याने खरेदी केलेल्या पक्षांसाठी व त्यांच्या निवाऱ्यासाठीच अनुदान देय राहील. या घटकांतर्गत ५० किंवा ५० पेक्षा जास्त पक्षी खरेदी करणे अनिवार्य आहे. निवाऱ्यासाठी रु. ७०/- प्रती चौ.फुट प्रमाणे मापदंड असून आवश्यकता असल्यास लाभार्थ्याने स्वत:च्या जागेवर स्वत:चे अथवा बाजारातून साहित्य उपलब्ध करून निवाऱ्याची सोय करावयाची आहे.
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५०% व अनुसूचीत जाती/जमातीतील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प खर्चाच्या ७५% अनुदान देय आहे. एका लाभार्थ्याने १०० पक्षी खरेदी करून निवाऱ्याची सोय केल्यास पक्षी खरेदीसाठी रु. १००००/- व निवाऱ्यासाठी रु. ७०००/- खर्चाच्या मापदंड आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी एकूण खर्च रु. १७०००/- च्या ५०% म्हणजेच रु. ८५००/- तर अनुसूचित जाती/जमातीतील लाभार्थ्यांसाठी ७५% म्हणजेच रु. १२७५०/- अनुदान देय आहे. मापदंडाव्यतिरिक्त जादाचा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. या घटकासाठी अर्ज केलेल्या परंतु अदयाप पक्षी खरेदी न केलेल्या लाभार्थ्यांना वरीलप्रमाणे अर्थसहाय्य देय राहील.
२०२१ सुधारित अनुदान खालीलप्रमाणे:
- जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
- जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 12750
अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
लाभार्थी:
१. इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठीचा प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
२. पूर्वसंमती मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत पक्षी खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
३. निवडलेल्या लाभार्थीने ग्राम कृषी संजीवनी समिती स्तरावर गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत पक्षी खरेदी करावी.
४. पक्षी खरेदी स्थानिक बाजारामध्ये करून ज्या गावातील बाजारात पक्षी खरेदी केली आहे त्या ग्रामपंचायतीची पक्षी खरेदी बाबतची तपशिलासह पावती सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थीच्या पसंतीनुसार दिलेल्या मापदंडानुसार देशी वाणाची पिल्ले ही स्थानिक पुरवठादाराकडून / अंडी उबवणी केंद्राकडून ग्राम कृषी संजीवनी समिती स्तरावरील पक्षी खरेदी समिती समवेत खरेदी करू शकतो.
५. पक्षांसाठी आवश्यक आकारमानाच्या निवाऱ्याची सोय स्थानिक अथवा बाजारातून साहित्य घेऊन करावयाची आहे.
६. परसबागेतील (Parsatil Kukkutpalan Yojana) कुक्कुटपालन या घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी करावी. सोबत खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीने प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकित करुन ऑनलाईन अपलोड कराव्यात.
७. पक्षी खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थीने स्वत: करावयाचा आहे.
परसातील कुक्कुटपालन (Parsatil Kukkutpalan Yojana) योजनेच्या अधिक माहिती करिता इथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा!
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
- PoCRA Yojana 2.0 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २०२४ ( पोकरा योजना टप्पा -२).
- ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’चा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; नव्या ७ हजार गावांचा समावेश !
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (PoCRA) योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!