गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे.
मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजना:
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरी, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक/सामुदायिक शेततळी याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते.
उपलब्ध सिंचनस्तोताचा पिकांसाठी संरक्षित सिंचनाबरोबर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करण्यासाठी वापर केल्यास, शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत एकात्मिक शेती पद्धती (A2.5) या घटकांतर्गत शेत तळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (A5.5) हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.
उद्देश:
1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये करण्यात आलेल्या गावसमूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
2. उपलब्ध नैसर्गिक साधनांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी कार्यक्षमपणे वापर करून मत्स्य शेती विकसित करणे व रोजगार वाढविणे .
3. संरक्षित सिंचना बरोबरच जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती द्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे.
लाभार्थी निवडीचे निकष:
१. प्रकलपांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/जमाती, महिला ,दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
२. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय, सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे आहे,अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
३. मत्सशेती अंतर्गत घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
४. पाण्याचा साठा किमान आठ ते दहा महिने असणे आवश्यक आहे.
५. मत्सपालन करण्यासाठी तलाव हे शक्यतो आयताकृती असावेत, ज्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळे फिरवणे सोयीचे जाते.
६. तलावाची खोली किमान १.२ मी ते २ मीटर असणे आवश्यक आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेत स्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा. तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
अधिक माहिती करिता इथे क्लिक करा.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!