आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची बायोमेट्रिक eKYC CSC सेंटर मधून करण्याची प्रोसेस ! (PMKisan Aadhar and Biometric eKYC)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली Aadhar eKYC करावी लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क करा.

पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तसंच सीएससीवर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदारासाठी प्रत्येकी 15 रुपये आकारले जातील, अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने PMKISAN अंतर्गत रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य केले आहे. मात्र, या घोषणेपासून पीएम किसान पोर्टलवरील ई-केवायसीचा पर्यायही बंद करण्यात आला आहे. आता लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक आधारित केवायसी करून घ्यावे लागेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – CSC सेंटरद्वारे बायोमेट्रिक eKYC प्रोसेस:

>

PM Kisan eKYC बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC सेंटरला भेट द्या. CSC सेंटर मधील VLE खालील केंद्र सरकारच्या PM Kisan CSC या अधिकृत पोर्टल वर लॉगिन करून आपली eKYC करून देतील.

https://exlink.pmkisan.gov.in/RedirecttoCSC.aspx

लॉग इन केल्यानंतर OTP/Biometric Aadhar Authentication वर क्लिक करा.

Biometric Aadhar Authentication
Biometric Aadhar Authentication

Aadhar Ekyc करण्यासाठी आपला आधार नंबर आणि कॅप्चा text टाकून सर्च करा आणि आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकून त्यावरील ओटीपी सबमिट करा.

PMKisan Aadhar Ekyc
PMKisan Aadhar Ekyc

पुढे Biometric फिंगरप्रिंट पर्यायाद्वारे शेतकऱ्याची पडताळणी करा आणि पेमेंट करा.

एकदा शेतकऱ्याने e-kyc प्रक्रिया पूर्ण केल्यावर, तो PM-KISAN योजनेमध्ये सत्यापित (verified) शेतकरी म्हणून गणला जाईल.

हेही वाचा – PM Kisan Beneficiary Status; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स चेक करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.