वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामे

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र बीड जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Beed District

महाराष्ट्र शासन, माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, यांचेकडील शासन निर्णय क्र. मातंस – १७१६/प्र.क्र.५१७ /३९, दिनांक १९ जानेवारी, २०१८ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र २५९ व शहरी क्षेत्र २२ अशा एकूण २८१ रिक्त असणा-या “आपले सरकार सेवा केंद्र” म्हणून सेवा देण्याकरिता इच्छुक उमेदवारांचे अटी शर्तीच्या अधिन राहून ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर दर्शविलेल्या लिंकद्वारे मागविण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी दिनांक १४.०६.२०२३ – २३.०६.२०२३ या कालावधीत या खालील दिलेल्या Google From ओपन करुन आवश्यक त्या माहितीसह व कागदपत्रासह आपले अर्ज सादर करावेत. विहित मुदतीत नंतर सदरची लिंक बंद करण्यात येईल. तसेच आपले सरकार सेवा केंद्र मिळणेबाबतचा अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारणे जाणार आहेत यांची घ्यावी.

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र बीड जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Beed District:

बीड जिल्हयातील तालुकानिहाय ग्रामीण क्षेत्र व शहरी क्षेत्रात रिक्त असलेल्या केंद्राची माहिती या कार्यालयाचे संकेतस्थळवर प्रसिध्द केलेली आहे. सदर यादीत प्रसिध्द केलेल्या रिक्त केंद्रांकरिताच अर्ज सादर करावेत.

आपले सरकार सेवा केंद्रा बाबत पात्र / अपात्र उमेदवार यांचेबाबत सर्व माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल त्या करीता कार्यालयाशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.

>

आपले सरकार सेवा केंद्र बाबत अटी व शर्ती

१. आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांचे अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन करावेत..

२. अर्ज करणारा नागरिक त्या गावचा रहिवासी असावा. जर त्या गावासाठी अर्ज आला नसेल तर जवळच्या गावाचा विचार करण्यात येईल.

३. अर्जदार यांचे आपले सरकार सेवा केंद्र असल्यास दुस-यांदा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. ४. नागरिक फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतात. त्याचे कुटुंबातून दुसरा अर्ज असल्यास तो ग्राहय

धरण्यात येणार नाही.

५. ज्या कुटुंबामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरवातीपासूनच असेल याचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

६. ऑनलाईन अर्जामध्ये जर माहिती चुकीची असेल तर त्याच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही सुध्दा करणेत येईल.

७. एका जागेसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालील प्रमाणे पात्रता निकष राहील.

i) प्रथम तो त्या गावांचा रहिवाशी असावा.

ii) रहिवाशी असल्यास सीएससी केंद्रास प्राधान्य देण्यात येईल.

iii) सीएससी केंद्र दोघांकडे असल्यास सीएससी केंद्रावरील व्यवहार जास्त असेल त्यांला प्राधान्य देण्यात येईल.

८. आपले सरकार सेवा केंद्र यांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांचे येणारे आदेश मान्य करावे लागतील.

९. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देणेत येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक राहील. आपले सरकार सेवा केंद्राची जागा बदललेस संबधीत आपले सरकार सेवा केंद्र बंद करणेत येईल.

१०. शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी २०१८ नुसार सर्व अटी व शर्ती मान्य राहतील. तसेच शासनाद्वारे दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देणे अनिवार्य राहील.

११. शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बेनर (परिशिष्ट ड), तसेच केंद्रामार्फत देणेत येणा-या सेवा (परिशिष्ट क दर्शनी भागात सेवानिहाय रेट चार्ट लावणे आवश्यक राहिल.

१२. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे लागेल.

१३. सर्व प्रकारचे डिजिटल पेमेंटला प्राधान्य दयावे लागेल.

१४. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र सुरु ठेवाव लागल.

१५. शासनाचे सर्व साहित्य याचे काटकसरीने वापर संरक्षण व जतन करणे.

१६. महा-आयटी यांनी नियुक्त केलेला तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्रची संपूर्ण चौकशी करु शकतील.

१७. नागरिकांची तक्रार आल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कारवाई करणेत येईल.

१८. आपले सरकार सेवा केंद्राकरीता कोणताही शासकीय परिसरामध्ये जागा मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

१९. आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीबाबतचा अंतिम अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतु समिती बीड यांचेकडे राखून ठेवलेला आहे.

अर्ज करण्याचे कालावधी: दिनांक १४.०६.२०२३ – २३.०६.२०२३

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.