सरकारी कामेआपले सरकार - महा-ऑनलाईनउद्योगनीतीजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र धुळे जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Dhule District

महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभागाकडील शासन निर्णय दि. 19/ 01/2018 च्या तरतुदीनुसार धुळे जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी नवीन महा ई सेवा केंद्र मंजुर करणे आवश्यक असल्याने सदरकामी जिल्ह्यात ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात शासकीय व निमशासकीय सेवा नागरीकांसाठी उपलब्ध करुन देणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्यात येणार येत आहेत.

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र धुळे जिल्हा – Aapale Sarkar Seva Kendra Dhule District:

  • जाहिरात प्रसिध्दी ( वर्तमानपत्र व वेबसाईट ) : दि . 27/9/2022.
  • अर्ज स्विकारणे : दि. 30/9/2022 ते दि. 31/10/2022 (कार्यालयीन वेळेत व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून).
  • प्राप्त अर्जाची छाननी : दि. 22/11/2022.
  • पात्र / अपात्र यादी प्रसिध्द करणे : दि. 30/11/2022.

आपले सरकार सेवा (महा ई सेवा केंद्र) मंजुरीचे अटी / निकष:

१) अर्जदार यांनी एका वेळी एकाच केंद्रासाठी अर्ज करावा, दोन अर्ज आढळल्यास प्रथम अर्जावर निर्णय घेण्यात येईल दुसरा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

>

२) अर्जातील मजकुर संपुर्ण भरणे आवश्यक आहे.

३) अर्जदार यांचेकडे सीएससी आयडी असणे आवश्यक.

४) अर्जदाराचे पोलीस विभागाकडील चारित्रपडताळणी मुळ प्रमाणपत्र आवश्यक.

५) आपले सरकार सेवा केंद्र ज्या ग्रामपंचायतीच्या व शहरी हद्दीच्या ठिकाणी मंजुर करावयाचे आहे अर्जदार हा त्याच ग्रामपंचायतीचा किंवा नागरी क्षेत्राचा रहीवासी असणे बंधनकारक आहे.

६) अर्जदार ज्या ग्रामपंचायतीचा किंवा नागरीक्षेत्राचा रहीवासी आहे त्याच ग्रामपंचायत किंवा नागरी क्षेत्रासाठी अर्ज करावा, इतर ग्रामपंचायतीसाठी किंवा नागरीक्षेत्रासाठी अर्ज केल्यास सदर अर्ज अपात्र समजण्यात येईल.

७) अर्जदार हा संगणक परिक्षा MSCIT किंवा CCC या संगणक संबंधी शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

८) अर्जदार यांचे कुटुंबात यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजुर नसावे.

९) अर्जदार शासकीय, निमशासकीय महामंडळ, बँक कर्मचारी नसावा.

१०) अर्जदार यांनी जाहिरातीत प्रसिध्द केलेल्या रिक्त जागांसाठीच अर्ज करावा.

११) आवश्यकतेनुसार रिक्त आपले सरकार सेवा ( महा ई सेवा केंद्रांची संख्या कमी अधिक करणेचे संपुर्ण अधिकार जिल्हाधिकारी धुळे यांचे राहातील.

आवश्यक कागदपत्रे: अर्जदार यांनी अर्जा सोबत खालील कागदपत्र जोडावीत.

१) अर्जदार यांचेकडे असलेला CSC प्रमाणपत्र व 1 पासपोर्ट फोटो.

२) अर्जदाराचे पोलीस विभागाकडील चारित्रपडताळणी मुळ प्रमाणपत्र.

३) सीएससी केंद्र मंजुर असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या केंद्रांचा Longitude व Latitude दर्शविणारा फोटो.

४) अर्जदार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड.

५) MSCIT प्रमाणपत्र किंवा CCC प्रमाणपत्राची प्रत.

६) सीएससी केंद्र सुरू असलेल्या मिळकतीचा उत्तारा / मिळकत अर्जदाराशिवाय कोणीही अन्य व्यक्तीच्या नावावर असल्यास त्यांचे संमतीपत्र / भाडेपट्टा सादर करणे आवश्यक.

७) जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा.

८) अर्जदाराचे कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर महा ई सेवा नसलेबाबत शपथपत्र

९) अर्जदार शासकीय, निमशासकीय महामंडळ, बँक कर्मचारी नसलेबाबत शपथपत्र.

आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज आणि आपले सरकार सेवा केंद्रांची रिक्त यादी: आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज आणि आपले सरकार सेवा केंद्रांची रिक्त यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.