महाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

राज्यातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी “आदिशक्ती अभियान”!

भारतीय संविधानात स्त्री-पुरुष समानतेची हमी दिली असली, तरी आजही अनेक महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावं लागतं. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महिलांचा सशक्त सहभाग अजूनही मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2025-26 पासून “आदिशक्ती अभियान – Adi Shakti Abhiyan” राबवण्याचा निर्णय घेतला असून, आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियान राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

राज्यातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी “आदिशक्ती अभियान”! Adi Shakti Abhiyan:

महाराष्ट्रात स्त्रियांचे प्रमाण जवळपास 60% आहे. या महिलांना केंद्रस्थानी ठेवून शासनाने विविध महिला हितधर्मी योजना राबवल्या आहेत. परंतु, या योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावी पोहोचल्या पाहिजेत, या उद्देशाने “आदिशक्ती अभियान (Adi Shakti Abhiyan)” राबवले जात आहे. महिला आणि बालकांच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या हेतूने हे विशेष आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियान तयार करण्यात आले आहे.

आदिशक्ती अभियानाची उद्दिष्टे:
  1. महिला समस्या समजून घेणे – गावपातळीवरील चळवळीतून महिला व किशोरींच्या आरोग्य, पोषण, शिक्षण इत्यादी समस्या ओळखणे व संवेदनशीलतेने उपाययोजना करणे.

  2. कुपोषण व बाल/मातामृत्यू कमी करणे – समाजात जागरूकता निर्माण करून कुपोषण मुक्त समाज घडवणे.

  3. लैंगिक भेदभाव व अत्याचार निर्मूलन – स्त्रियांच्या विरोधातील रूढी, अत्याचार, लैंगिक शोषण इ.ला आळा घालणे.

  4. पंचायतराज व्यवस्थेत महिला नेतृत्व – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे.

  5. शासन योजनांचा लाभ आणि स्वावलंबन – शिक्षण, रोजगार व निर्णय प्रक्रियेत महिलांना समान संधी मिळवून देणे.

रचना व अंमलबजावणी यंत्रणा:

आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियान यशस्वी करण्यासाठी विविध स्तरांवर सहमत्यांचे गठन करण्यात आले आहे:

  • ग्रामस्तर सहमती: ग्रामपंचायतीमध्ये महिलांची प्रतिनिधी असलेली टीम तयार केली जाते, ज्यामध्ये आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस पाटील यांचा समावेश असतो.

  • तालुकास्तर सहमती: बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समन्वय राखला जातो.

  • जिल्हास्तर सहमती: जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियानाचा आढावा घेऊन तालुक्यांना मार्गदर्शन केले जाते.

  • विभागस्तर आणि राज्यस्तर सहमती: आयुक्त, महिला व बालकल्याण यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरावर समन्वय व धोरणात्मक निर्णय घेतले जातात.

अभियानाचे महत्त्वाचे घटक:

1. महिला विकास

  • बालविवाह प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कार्य

  • एकल महिला, विधवा यांचे सशक्तीकरण

  • शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे

2. महिला सक्षमीकरण

  • महिला बचतगटाचे सशक्तीकरण

  • 10वी/12वी उत्तीर्ण मुलींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

  • मोबाईल, बँक खाते, मालमत्ता नोंदणीसाठी जागरूकता

3. जनजागृती आणि प्रबोधन

  • रॅली, चौक सभा, फेरी, स्पर्धा यांचे आयोजन

  • कायदे, योजना, सुविधा यांची माहिती

4. ग्राम सुरक्षा यंत्रणा

  • आरोग्य, शिक्षण, संरक्षण विषयक समित्या कार्यरत करणे

  • महिलांसाठी सुरक्षित स्थाननिर्धारण

5. सामाजिक सुरक्षा

  • वृद्ध, अपंग, अनाथ, कुमारी माता यांच्यासाठी योजना

  • समाजात स्त्री-पुरुष जन्म प्रमाण सुधारण्याचे प्रयत्न

6. आरोग्य

  • नियमित हिमोग्लोबिन चाचणी व आरोग्य तपासणी

  • संस्थात्मक प्रसूती प्रोत्साहन

  • मासिक पाळी संदर्भात जागरूकता

7. शिक्षण

  • शाळाबाह्य मुलींना परत शाळेत आणणे

  • उच्च गुण मिळवलेल्या मुलींचा गौरव

  • महिला आर्थिक साक्षरता

8. पर्यावरण

  • झाडे लावणे व संगोपन

  • अंगणवाड्यांसाठी परसबागांचे प्रोत्साहन

आदिशक्ती पुरस्कार योजना:

आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आदिशक्ती पुरस्कार” दिला जातो. तीन स्तरांवर हा पुरस्कार दिला जातो.

स्तरप्रथम पुरस्कारद्वितीय पुरस्कारतृतीय पुरस्कार
तालुका₹1 लाख₹50 हजार₹25 हजार
जिल्हा₹5 लाख₹3 लाख₹1 लाख
राज्य₹10 लाख₹7 लाख₹5 लाख

आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियान म्हणजे केवळ एक योजना नाही, तर महिलांच्या हक्कांची, त्यांच्या स्वातंत्र्याची, त्यांच्या आत्मसन्मानाची एक मोठी चळवळ आहे. ही चळवळ केवळ महिलांना सशक्त बनवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक सशक्त, समतोल आणि न्यायपूर्ण समाजनिर्मितीचा आधार आहे. राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा जो संकल्प केला आहे, तो “आदिशक्ती अभियान (Adi Shakti Abhiyan)” द्वारे कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अभियान महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय लिहील आणि ‘सबला नारी, समृद्ध महाराष्ट्र’ या दृष्टीकोनाला बळ देईल, यात शंका नाही.

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती (Adi Shakti Abhiyan) अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

खालील लेख देखील वाचा !

  1. एलआयसी विमा सखी योजना – महिलांना मिळणार ७ हजार रुपये महिना !
  2. महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना : आर्थिक सहाय्य रुपये १ लाख ते रुपये २५ लाखांपर्यंत !
  3. पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेचा शासन निर्णय जारी !
  4. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  5. महिलांसाठी जननी सुरक्षा व जननी‍ शिशु सुरक्षा योजना
  6. (MSSC) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना – Mahila Samman Savings Certificates
  7. सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)
  8.  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.