वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

रास्तभाव धान्य दुकानासाठी अर्ज सुरु 2023 – नंदुरबार जिल्हा

तमाम लोकांस कळविणेत येते कि, रास्तभाव दुकान परवाने मंजूर करणेबाबत शासनाची विविध परिपत्रके व शासन निर्णयान्वये सुचित केलेनुसार खालील प्रमाणे नमुद केलेल्या नंदुरबार जिल्हयातील आजमितीस रद्द असलेल्या व राजिनामा दिलेल्या दुकानाच्या ठिकाणी महाराष्ट्र शासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र. रामादु 1716/प्र.क्र.239/नापु-31 दि. 6 जुलै 2017 व शासनाचे पत्र दि. 07 सप्टेंबर 2018 मध्ये नमुद केलेल्या प्राथम्युक्रमानुसार नविन रास्तभाव (रेशन) दुकान परवाने मंजुर करणेकामी जाहिरनामा प्रसिध्द करणेत येत असुन रास्तभाव (रेशन) दुकान परवाने घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडुन याद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. या करीता विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत.

रास्तभाव धान्य दुकानासाठी अर्ज सुरु 2023 – नंदुरबार जिल्हा:

                                                        गोषवारा
                                    जाहिरनामा काढण्याकरीता प्रस्तावित
तालुका गावे एकूण दुकाने
नंदुरबार नंदुरबार शहारातील श्रीमती प्रतिभा सतिष करंजीकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेले रास्तभाव दुकान करीता 1
नंदुरबार शहरातील श्री धनंजय नारायण सोनवणे यांचा परवाना रद्द झालेने रिक्त असलेले रास्तभाव दुकान करीता 1
नंदुरबार शहरातील श्रीमती रेखा प्रविण चौधरी यांचा परवाना रद्द झालेने रिक्त असलेले रास्तभाव दुकान करीता 1
नंदुरबार शहरातील फ्रान्सिस जेम्स पंजाबी यांचा परवाना रद्द झालेने रिक्त असलेले रास्तभाव दुकान करीता 1
नंदुरबार शहरातील अहिल्यादेवी संस्था यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेले रास्तभाव दुकान करीता 1
बामडोद 1
ओझदे 1
अक्कलकुवा वडली 1
जुना नागरमुठा 1
भोयरा 1
खापरान 1
रेथी 1
शहादा कमखेडा 1
शिरुड तह 1
कमरायव 1
एकूण 15

कामाचे स्वरुप/कालावधी

अ. क्र. कामाचे स्वरुप कार्यक्रमाचा कालावधी
1 अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्ट, 2023
2 अर्ज छाननी 7 ऑगस्ट, 2023

प्रस्तावित रास्तभाव दुकान मंजूरीकरीता नियम, अटी व शर्ती इत्यांदीसह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत संबंधीत तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय नंदुरबार येथे तसेच नंदुरबार जिल्हयाचे अधिकृत संकेतस्थळ www.nandurbar.nic.in वर उपलब्ध आहे.

>

अर्जासोबत कागदपत्रे:

1. मतदाराचे नाव, बँक खाते व वैध प्रमाण

2. संस्था / गट कार्यान्वित असलेबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला

3. परवाना चालविणेसाठी जागेचा उतारा गाव नमुना नं. 8 ( जागा मालकाचे 100 रु स्टॅम्पवर संमत्तीपत्र)

4. चालू आर्थिक वर्षाचे तेरीजपत्र नफा-तोटा पत्रक, ताळेबंद आहे अगर कसे साक्षांकित प्रत

5. प्रतवारी ऑडीट अहवाल आणि नियमावली

6. मासिक जमा खर्च (शेवटचा महिना )

7. परवाना चालविणेसाठी तयार असल्याबाबत ठराव

8. संबंधित महिला आर्थिक विकास मंडळ व इतर संस्था यांचे बचतगटाला भेटी व अभिप्राय नोंदी

9. विशेष उल्लेखनिय कामाबाबतची प्रमाणपत्रे (उदा. राजमाता जिजाऊ पुरस्कार)

10. अध्यक्ष, सभासद नोकरीस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र

11. स्थानिक रहिवास बाबत दाखला

12.परतफेडीचे प्रमाण 80% आहे किंवा कसे याबाबत दाखला (म. आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडील)

हेही वाचा – नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.