आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंदनकारक; HSRP नंबर प्लेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !

अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) (High Security Registration Plate – HSRP) आता वाहनांना बसवावी लागणार आहे, सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्र, जुन्या वाहनधारकांनी लवकर अशा प्रकारची नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP (High Security Registration Plate) बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. ११६२ (E) दि.०४/१२/२०१८ व ९.०. ६०५२ (E) दि ०६/१२/२०१८ नुसार दि.०१/०४/२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे अत्यावश्यक असून मा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि.०१/०४/२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP – High Security Registration Plate):

HSRP, किंवा उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट, भारतातील वाहनांसाठी छेडछाड-पुरावा आणि प्रमाणित नंबर प्लेट आहे. ही एक ॲल्युमिनियम नंबर प्लेट आहे ज्यामध्ये दोन नॉन-फंक्शनल लॉक असतात जे वाहनाला जोडलेले असतात.

नंबर प्लेटसाठीचे शुल्क:
वाहनाचा प्रकारशुल्क
दुचाकी, ट्रॅक्टर४५०
तीनचाकी५००
चारचाकी, अन्य वाहने७४५

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज – Apply High Security Registration Plate Online:

आपल्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (High Security Registration Plate – HSRP) बसवण्यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.

https://transport.maharashtra.gov.in/1035/Home

वेबसाईट ओपन झाल्यानंतर HSRP Online Booking हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

HSRP Online Booking
HSRP Online Booking

HSRP Online Booking पर्यायावर क्लिक केल्यानंतर Apply High Security Registration Plate Online हा पर्याय दिसेल तिथून RTO ऑफिस सिलेक्ट करायचे आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.

Apply High Security Registration Plate Online
Apply High Security Registration Plate Online

त्यानंतर नवीन पेज वर Book High Security Registration Plate येथील Book या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Book या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Booking Details टाकायच्या आहेत त्यामध्ये राज्य, Registration Number म्हणजे गाडीचा नंबर, Chassis No, Engine No, Mobile No, Captcha टाकून Click Here या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेजवर आपण भरलेली माहिती सर्व बरोबर असेल तर सर्व माहिती तिथे दाखवली जाईल.

त्यानंतर Contact Information मध्ये Owner Name, Email ID, Billing Address टाकून Next पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर आपण जो मोबाइल नंबर दिलाय त्यावर OTP येईल तो टाकून Next पर्यायावर क्लिक करा.

Next पर्यायावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये Appointment at Affixation Center म्हणजेच Appointment Center आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नंबर प्लेट बसवू शकता किंवा दुसरा ऑपशन म्हणजे Home Delivery त्यामध्ये काही ठराविक जे पिनकोड आहेत त्या ठिकाणी हि सुविधा उपलब्ध आहे.

जर आपण दुसरा ऑपशन सिलेक्ट केला तर त्यामध्ये आपल्याला पिनकोड टाकायचा आहे व Check Availability या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

जर त्या ठिकाणी ही सुविधा नसेल तर खालील Appointment at Affixation Center या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर राज्य, जिल्हा निवडा व Near Me वर क्लिक करून आपल्या जवळील सेंटर वर क्लिक करून Confirm Dealer वरती क्लिक करा.

Confirm Dealer वरती क्लिक केल्यानंतर Appointment Date व Time Slot दाखवला जाईल त्यातील योग्य तारीख व वेळ निवडून Confirm & Proceed या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Appointment Details दाखवली जातील ती वाचून Confirm & Proceed या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर Total Cost दाखवली जाईल त्यामध्ये खालील I agree वर क्लिक करून Pay Online या पर्यायावर क्लिक करा. Payment आपण UPI, Cards, Netbanking, wallet या माध्यमातून करू शकता.

Payment Done झाल्यानंतर HSRP Appointment Receipt भेटेल ती Save करून ठेवा. व त्या तारखेला ही Receipt आपली गाडी व RC Copy त्या ठिकाणी घेऊन जायची आहे.

या लेखात, आम्ही वाहनांना हाय सिक्युरिटी (High Security Registration Plate – HSRP) रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंदनकारक; HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा!

  1. घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!
  2. वाहन 4.0 पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या !
  3. नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी !
  4. राज्यात RTO च्या सहा सेवा ऑनलाईन आणि फेसलेस; वाहन चालकांना फायदा होणार!
  5. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
  6. दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
  7. गाडीचे आरसी बुक ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
  8. CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे !
  9. या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक !
  10. वाहनांच्या सुगम स्थलांतरणाकरिता केंद्र सरकारने सुरु केली भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी वाहन नोंदणी मालिका
  11. वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती
  12. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरण
  13. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत सवलतींबाबतची अधिसूचना जारी !
  14. ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करण्याच्या कार्यपध्दती !
  15. मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
  16. पर्यावरणपूरक वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
  17. पिंक ई-रिक्षा योजना; सुधारित शासन निर्णय !
  18. परदेशात कार चालवायची असेल तर इथेच काढा परवाना !
  19. रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.