आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!

‘वाहन क्रमांकाची (Fancy Vehicle Number) मालिका आणि परिवहन संकेतस्थळाचे सॉफ्टवेअर यांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. परिवहनच्या संकेतस्थळाला पेमेंट गेटवे जोडण्यात येईल. यामुळे सर्व ऑनलाइन पर्यायांमधून वाहनचालकांना शुल्क भरून क्रमांक घेता येईल.

नवीन नोंदणी (Fancy Vehicle Number) क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते.  लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी (Fancy Vehicle Number) क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ‘द इंटीग्रेटेड सोल्युशन फॉर बुकींग ऑफ रजिस्ट्रेशन मार्क ऑफ चॉईस’  ही ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

या सुविधेबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड जि. पुणे येथे चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविना) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून खालील फॅन्सी नंबर परिवहन सेवा संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी (Fancy Vehicle Number) क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक (Fancy Vehicle Number) आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या (Fancy Vehicle Number) क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी (Fancy Vehicle Number) क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या (Fancy Vehicle Number) क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती ऑफलाईन पद्धतीने जारी करण्यात येईल, असे परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Fancy Vehicle Number:

लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद करता येणार आहे. आता वाहनधारकांचे आरटीओ कार्यालयातील फेऱ्या बंद करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. पसंतीचा वाहन (Fancy Vehicle Number) क्रमांक मिळण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

https://fancy.parivahan.gov.in/

अर्जदाराने या संकेतस्थळावर जावून User ? Register Now यावर क्लिक करावे.

User Register Now (Fancy Vehicle Number)
User Register Now

यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे.

त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक (Fancy Vehicle Number) निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेयमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी.

त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

खालील लेख देखील वाचा!

  1. वाहन 4.0 पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या !
  2. नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी !
  3. राज्यात RTO च्या सहा सेवा ऑनलाईन आणि फेसलेस; वाहन चालकांना फायदा होणार!
  4. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
  5. दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
  6. गाडीचे आरसी बुक ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
  7. CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे !
  8. या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक !
  9. वाहनांच्या सुगम स्थलांतरणाकरिता केंद्र सरकारने सुरु केली भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी वाहन नोंदणी मालिका
  10. वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती
  11. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरण
  12. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत सवलतींबाबतची अधिसूचना जारी !
  13. ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करण्याच्या कार्यपध्दती !
  14. मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
  15. पर्यावरणपूरक वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
  16. पिंक ई-रिक्षा योजना; सुधारित शासन निर्णय !
  17. परदेशात कार चालवायची असेल तर इथेच काढा परवाना !
  18. रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.