कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
शेतकऱ्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर वाढावा, उत्पादनक्षमता सुधारावी आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी राज्य शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजना (Krushi Yantrikikaran Yojana) सुरू केली आहे. या योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, काढणीनंतरची उपकरणे, फळोत्पादन साधने, तसेच बैल व मनुष्यचलित अवजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना – Krushi Yantrikikaran Yojana:
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज केल्यास, पात्रतेनुसार त्यांना थेट बँक खात्यात अनुदान मिळते.
योजनेचा उद्देश:
शेतीत ऊर्जा वापर वाढवणे (2 एचपी/हेक्टर पर्यंत).
लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक साधने पोहोचवणे.
प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व जनजागृती करून कृषी (Krushi Yantrikikaran Yojana) यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.
अनुदानाखाली मिळणारी अवजारे:
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.
ट्रॅक्टर
पॉवर टिलर
ट्रॅक्टर/पॉवर टिलर चालित अवजारे
बैल चालित साधने
मनुष्य चालित अवजारे
प्रक्रिया यंत्रे
काढणीनंतरची साधने
फळोत्पादन साधने
विशेष प्रकारची उपकरणे
स्वयंचलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
१) कृषि अवजारे बँकेची स्थापना
२) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
महाडीबीटी पोर्टल कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ((Krushi Yantrikikaran Yojana)) लाभाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.
पात्रता निकष:
अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
7/12 उतारा आणि 8A दाखला आवश्यक.
अनुसूचित जाती/जमाती शेतकऱ्यांसाठी जात दाखला.
एकाच वेळी एका घटकासाठीच अनुदान.
एखाद्या घटकाचा लाभ घेतल्यास त्याच घटकासाठी पुन्हा अर्ज 10 वर्षांनंतरच करता येईल.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
7/12 उतारा, 8A दाखला
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन
मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा अहवाल
स्वयंघोषणापत्र
पूर्वसंमती पत्र
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – Apply Online Krushi Yantrikikaran Yojana:
कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.
ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
महाडीबीटी पोर्टलवर यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran Yojana) या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या पर्यायामध्ये कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा. पुढे तपशील मध्ये आवश्यक पर्याय निवडा आणि पुढील बाबी तपासून निवडा.
अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा.
आता पुढे पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.
योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. पुढे अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी Make Payment या बटनावर क्लिक करा.
पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.
अर्जाचे स्टेटस पहा (Application Status):
महाडीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या.
तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.
छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.
योजनेचे फायदे
वेळ व श्रम वाचतो.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढते.
लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही महागड्या साधनांचा लाभ.
अनुदान थेट खात्यात मिळते, मध्यस्थ नाहीत.
महत्त्वाच्या सूचना:
मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा.
एकदा अर्ज सबमिट झाल्यावर तो योग्यरीत्या तपासा.
पूर्वी अर्ज केले असल्यास पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही.
महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
कृषी यांत्रिकीकरण योजना (Krushi Yantrikikaran Yojana) ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, फळोत्पादन यंत्रे आणि इतर अवजारे खरेदीसाठी अनुदान मिळवू शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनी ही संधी नक्कीच घ्यावी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ-Krushi Yantrikikaran Yojana)
प्र. 1: कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran Yojana) योजनेत कोणते अवजारे खरेदी करता येतात?
उ. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, बैल व मनुष्यचलित साधने, फळोत्पादन यंत्रे, काढणीनंतरची साधने इत्यादी.
प्र. 2: अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उ. आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A दाखला, कोटेशन, तपासणी अहवाल, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
प्र. 3: अर्ज कसा करावा?
उ. महा डीबीटी पोर्टल वर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज भरावा.
प्र. 4: अनुदान कधी मिळते?
उ. अर्ज तपासणी व लॉटरीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होते.
या लेखात, आम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना (Krushi Yantrikikaran Yojana) या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- बॅटरी फवारणी पंप १००% अनुदानसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
- सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
- कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!