वृत्त विशेषकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी वितरीत

राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २३.१०.२०२० रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक २९.१०.२०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यानुसार खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य कार्यकारी समितीच्या दि. ३.११.२०२० रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्रमांक ३ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये प्रथम हप्त्यापोटी रू. २२९७०६.३७ लक्ष व अंतिम हप्त्यापोटी रु. २१९२८९.०५ लक्ष इतका असा एकूण रू. ४४८९९५.४२ लक्ष एवढा निधी विविध बाबींसाठी वितरीत करण्यात आला आहे. तद्नंतर जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना अद्यापही संपूर्ण वाटप करण्यात आले नसल्याच्या तक्रारी येत असल्याने अतिरिक्त निधीबाबत विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्त प्रस्तावावर मंत्रिमंडळ उपसमितीत दि. २७.१०.२०२१ च्या बैठकीतील निर्णयानुसार संबंधित विभागीय आयुक्त यांना निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत:

राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेलया बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्रमांक ४ ते ७ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, तसेच संदर्भ क्र.८ येथील अहवालाचा विचार करून या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण रू. ३३६४.०६ लक्ष ( रूपये तेहत्तीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार फक्त ) इतका अतिरिक्त निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

या आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत:

बाबदयावयाची मदतमदतीची रक्कम
शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतजून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ % नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचना खालील पिके) नुकसानीसाठी रु १०,०००/- प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रू. २५०००/- प्रति हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी.शासन निर्णय, दि १३.५.२०१५ नुसार दयावयाच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( SDRF ) मधून खर्च करण्यात यावा व वाढीव दरानुसार खर्च करण्यात यावा व वाढीव दरानुसार होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात यावा.

उपरोक्तप्रमाणे बाधित नागरिकांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या २७.१०.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र – अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त निधी रू. ३३६४.०६ लक्ष ( रूपये तेहत्तीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार फक्त ) इतकी रक्कम मागणी क्रमांक सी -६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य अंतर्गत लेखाशीर्षाअंतर्गत ३१ सहाय्यक अनुदाने या उदिष्टाखाली उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या प्रयोजनासाठी होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर निधी बीम्स प्रणालीवर म -११ कार्यासन यांनी तात्काळ वितरीत करावा.

अ ) प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी १०१, अनुग्रह सहाय्य ( ९१ ) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, ( ९१ ) ( ०५ ) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत ३१ सहाय्यक अनुदाने ( २२४५२४५२ )

ब ) प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य ( ९२ ) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च, ( ९२ ) ( १२ ) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य, ३१ सहाय्यक अनुदाने ( २२४५२३०९ )

उपरोक्त निधीचे बाधितांना वाटप करताना खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्रमांक १, २, ३ येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच, या प्रकरणी संबंधित सर्कलमध्ये २४ तासात ६५ मी.मी. पाऊस व ३३ % नुकसानीची अट पूर्ण होत असल्याची खात्री करूनच हा निधी प्रत्यक्ष वितरीत करावा.

शासन निर्णय, दिनांक ९.११.२०२० व दि ७.१.२०२१ अन्वये वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी मालेगाव तालुक्यातील निकषानुसार पात्र बाधित शेतकऱ्यांना निधी वितरीत न करता अपात्र शेतकऱ्यांना तहसिलदार, मालेगाव यांनी निधी वितरीत केला आहे. सबब, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी प्रस्तावित केल्यानुसार या निकषानुसार अपात्र शेतक-यांकडून PM – KISAN च्या धर्तीवर वसूली करावी ही वसुली शक्य न झाल्यास, त्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला निधी भविष्यात कधी अतिवृष्टीमुळे अथवा अन्यथा शेतीपिकांचे नुकसान झाल्यास आणि त्यामध्ये या शेतकऱ्यांना मदत देय ठरत असल्यास उक्त अपात्र असतानाही वितरीत केलेला मदतीचा निधी समायोजित करून त्यांना प्रत्यक्षात देय असलेला निधी वितरीत करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्यावर सोपविण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८९ / व्यय – ९ / २०२२, दिनांक ०५.०३.२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग शासन निर्णय: जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे, २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळेशेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत:

राज्यात माहे डिसेंबर, २०१९ जानेवारी, २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठविण्याच्या सुचना शासन पत्र दि.३.१.२०२० अन्वये देण्यात आलेल्या होता. सदर सुचनानुसार संयुक्त पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडून दि. १५.०९.२०२० व दि. १७.०७.२०२० पत्रान्वये प्राप्त झाले. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि. १६.१२.२०२० रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांना खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

माहे फेब्रुवारी ते मे, २०२० या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये एकूण रु. २४७७६.५२ लक्ष ( रूपये दोनशे सत्तेचाळीस कोटी शहात्तर लक्ष बावन्न हजार फक्त ) इतका निधी सर्व विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात आला आहे.

खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी दि. ४.६.२०२० अन्वये अमरावती जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या १८२३६ एकूण बाधित क्षेत्र १०९१३.५६ यासाठी रु.१८८४.५१ लक्ष इतक्या निधीची मागणी केली. तद्नंतर विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या दि. १३.७.२०२० च्या खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये सुधारित प्रस्ताव सादर केला असून अमरावती जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या १८५२५ एकूण बाधित क्षेत्र १११७६.९३ यासाठी रु. १९२३.३२ लक्ष इतक्या निधीची सुधारित मागणी केली आहे. तथापि, खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त, अमरावती यांना बाधित क्षेत्र १०९१३.५६ यासाठी रु. १८८४.५१ लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडून उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी होत असल्याने व त्यांनी खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ३ व ४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार अमरावती जिल्हयाकरीता रु. ३८.८० लक्ष (रु. अडतीस लक्ष ऐंशी हजार फक्त ) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात यावी :

1. प्रचलित नियमानुसार शेती / बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील.

2. प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवकांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे.

३. बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी.

४. कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत देवू नये.

५. मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत.

६. मदतीचे वाटप करताना मदतीची व्दिरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.

उपरोक्तप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रु.३८.८० लक्ष रुपये अडतीस लक्ष ऐंशी हजार फक्त ) इतका निधी मागणी क्रमांक सी -६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी १०१, अनुग्रह सहाय्य (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, ( ९१ ) ( ०५ ) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत ३१ सहाय्यक अनुदाने ( २२४५ २४५२ ) या लेखाशीर्षाखाली सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या निधीमधून वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. कार्यासन म ११ यांनी सदर निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करावा.

वरील निधी खर्च करताना खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तातंरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.

सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या महालेखापाल कार्यालयास व शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील.

खालील शासन निर्णयातील खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ५ येथील वित्त विभाग, परिपत्रक दि.४.०४.२०२२ मधिल परिशिष्ठ १ ते १० या अटींची पुर्तता होत असल्याने सदरचा निधी वितरित करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग शासन निर्णय : राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे, २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळेशेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग नुकसान भरपाईसाठी असा करा क्लेम आणि लाभ मिळवा – Crop Insurance Claim

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.