वृत्त विशेष

रचना सहायक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील पद भरती – Design Assistant, Group-B (Non-Gazetted) Cadre Recruitment

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयातील राज्यस्तरीय गट ब मधील रचना सहायक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. याबाबतची जाहिरात राज्यस्तरावर एकाच वेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. तरी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होईल अशा राज्यस्तरीय ‘अ’ वर्ग मराठी दैनिक वृत्तपत्रात तसेच इंग्रजी दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यासाठी जाहिरातीचा मसुदा सोबत तीन प्रतीत पुरविण्यात येत आहे. सदरहु जाहिरात उक्त नमूद वृत्तपत्रांमध्ये दि. २९.०३.२०२३ रोजी प्रकाशित होणे आवश्यक आहे. जाहिरातीचा आकार आणि फॉन्ट या बाबी सोबत जोडण्यात येत असलेल्या जाहिरातीपेक्षा भिन्न आणि जादा आकाराच्या नसाव्यात. दिलेल्या सूचनेनुसार जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास जाहिरातीसाठी जादा उपयोगात आणलेल्या भागाचे देयक संचालनालयाकडून अदा केले जाणार नाही, याचीसुद्धा संबंधित वृत्तपत्र कार्यालयास कृपया जाणीव करुन देणेत यावी.

कृपया जाहिरात कोणत्या दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे, याबाबतची माहिती या कार्यालयास वृत्तपत्रांच्या ५ प्रतीसह पाठवावी. प्रत सहसंचालक, नगर रचना, पुणे/नाशिक/कोकण/ औरंगाबाद / अमरावती / नागपूर विभाग यांना माहितीसाठी व पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी, /- त्यांना कळविण्यात येते की, आपल्या अधिपत्याखालील जिल्ह्यांमधील दैनिक वृत्तपत्रामध्ये सदर जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा व प्रस्तुतची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राच्या प्रती संचालनालयास सादर कराव्यात.

रचना सहायक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करणेबाबत परिपत्रक:

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक / औरंगाबाद/ अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर दि. ०१/०४/२०२३ पासून उपलब्ध होईल. तसेच सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

वेळापत्रक :

अ.क्र.कार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा अंतीम दिनांक३०/०४/२०२३, वेळ २३.५९ पर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे१६/०५/२०२३ पासून परिक्षेपूर्वी पर्यंत
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक२९/०५/२०२३*

आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतचा तपशिल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

रिक्त पदांचा तपशील : संवर्ग-रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित)

वेतनश्रेणी : वेतनस्तर एस-१४.रु.३८६०० १२२८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

समांतर आरक्षणाचा तपशील
अ.क्र.सामाजिक आरक्षण भरावयाची एकूण पदे महिला ३० टक्केखेळाडू ५ टक्केसर्वसाधारण
अनुसूचित जाती३०१९
अनुसूचित जमाती२६१७
विमुक्त जाती (अ)११०७
भटक्या जमाती (ब)
भटक्या जमाती (क)
भटक्या जमाती (ड)
विशेष मागास प्रवर्ग
इतर मागास वर्ग२२१४
ईडब्ल्यूएस१८१२
१०खुला५५१६३६
एकूण१७७ ५३११५

टिप :

१) वरील राखीव / बिनराखीव तसेच एकूण पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करुन पद भरतीची कार्यवाही करण्यात येईल.

२) उपरोक्त १७७ रिक्त पदांपैकी ०२ पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील.

३) उपरोक्त १७७ रिक्त पदांपैकी ०७ पदे ही शासन नियमानुसार दिव्यांगांच्या खालील प्रवर्गासाठी प्रत्येक गटासाठी (a, b, c, d) पुढील प्रमाणे पदे आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील,

(a)कर्णबधीरता किंवा ऐकु येण्यातील दुर्बलता (D – Deaf, HH- Hard of Hearing) – २ पदे
(b)अस्थीव्यंगता/ मेंदुचा पक्षघात (OA – एक हात, OL – एक पाय, BL – दोन्ही पाय, OAL एक हात आणि एक पाय,  CP – Cerebral palsy) /कुष्ठरोग मुक्त (LC – Laprasy cured ) / शारीरिक वाढ खुंटणे (DW- Dwarfism) / आम्ल हल्लाग्रस्त (AAV Acid Attack Victims) – २ पदे
(c)विशिष्ट शिक्षण अक्षमता (SLD – Specific Learning Disability) – २ पदे
(d)एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व वरील (a) ते (c) (MD –  Multiple dsabilities involving (a) to (c) Above )- १ पद

सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता :-

अ.क्रपदकिमान शैक्षणिक अर्हता
रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित)स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

उक्त पदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

१) उक्त पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी / खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी/ अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.

२) मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

परीक्षा शुल्क:

पदनामअराखीव (खुला) प्रवर्गराखीव प्रवर्ग
रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित)१०००/-९००/-

उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील

प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम, पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या इ. याबाबतच्या तपशिलासाठी www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.mabarashtra.gov.in http://ese.mah.nic.in या व संकेतस्थळावरील “सर्वसाधारण सूचना मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे, भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in व http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करुन घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल यात कोणताही दावा करता येणार नाही.

हेही वाचा – राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती – Maharashtra State Excise department Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.