सरकारी कामेआपले सरकार - महा-ऑनलाईनइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयवृत्त विशेष

आधार कार्ड ओळखपत्रामधील कागदपत्रांचे मोफत ऑनलाईन अपडेट करता येणार ! – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नागरिकांना त्यांच्या आधार ओळखपत्रामधील  कागदपत्रांचे मोफत अद्ययावतीकरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या लोक-केंद्रित निर्णयाचा लाखो नागरिकांना लाभ मिळणार आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून, हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी माय आधार (myAadhaar) पोर्टलवर आपले दस्त ऐवज अद्ययावत करण्यासाठी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही मोफत सेवा पुढील तीन महिने म्हणजेच, 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीमध्ये उपलब्ध आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की ही सेवा केवळ myAadhaar या पोर्टलवर विनामूल्य आहे, आणि प्रत्यक्ष  आधार केंद्रांवर यासाठी पूर्वी प्रमाणे 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, नागरिकांना आपल्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा (PoI/PoA) असलेले दस्तऐवज, विशेषत: आधार 10 वर्षांपूर्वी जारी केले असेल, आणि त्याचे कधीच अद्ययावतीकरण केले नसेल, तर संबंधित दस्त ऐवाजांच्या लोकसंख्याशास्त्रीय तपशीलांचे पुनर्र-प्रमाणीकरण करण्यासाठी, अपलोड करायला प्रोत्साहन देत आहे. यामुळे राहणीमानात सुलभता, सेवांचे उत्तम वितरण आणि प्रमाणीकरणाच्या यशाचा दर वाढायला मदत होईल.

लोकसंख्याशास्त्रीय तपशील (नाव, जन्मतारीख, पत्ता इ.) बदलण्याची गरज असेल, तर नागरिक  नियमित ऑनलाइन अपडेट (अद्ययावतीकरण) सेवा वापरू शकतात किंवा जवळच्या आधार केंद्राला भेट देऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये सामान्य शुल्क लागू होईल.

आधार कार्ड ओळखपत्रामधील कागदपत्रांचे मोफत ऑनलाईन अपडेट करता येणार !:

  • नागरिक त्यांचा आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करू शकतात.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल,
  • संबंधित नागरिकाला केवळ ‘दस्तऐवज अपडेट’ वर क्लिक करावे लागेल, आणि त्याचे विद्यमान तपशील प्रदर्शित केले जातील.
  • आधार धारकाने तपशील सत्यापित करणे आवश्यक आहे, योग्य आढळले, तर पुढील हायपर-लिंकवर क्लिक करावे.
  • पुढील स्क्रीनमध्ये, रहिवाशांना ड्रॉपडाउन सूचीमधून ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा असलेला दस्तऐवज निवडावा लागेल, आणि त्याने/तिने आपले दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी त्याच्या प्रती अपलोड कराव्यात.
  • अद्ययावत केलेल्या आणि स्वीकारार्ह PoA आणि PoI दस्तऐवजांची यादी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

गेल्या दशकात, आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशांसाठी ओळखीचा सर्वत्र स्वीकारला जाणारा  पुरावा म्हणून उदयाला आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या जवळजवळ 1,200 सरकारी योजना आणि कार्यक्रमांमधील सेवांच्या वितरणासाठी आधार क्रमांकाची ओळख वापरली जात आहे. याशिवाय, बँका, एनबीएफसी इत्यादी वित्तीय संस्थांसह इतर सेवा पुरवठादारांच्या अनेक सेवा देखील ग्राहकांचे अखंड प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यांना आपल्या सेवेत समाविष्ट  करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करत आहेत.

आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण अधिनियम, 2016 नुसार; आधार क्रमांक धारक, आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी, त्यांच्या माहितीची अचूकता कायम असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी, ,  POI आणि POA दस्तऐवज दाखल करून, आपली आधारभूत कागदपत्रे किमान एकदा, आधार ओळख पत्रामध्ये अपडेट करू शकतात.

हेही वाचा – आधार कार्ड (नाव, पत्ता, जन्म तारीख व लिंग) मध्ये बदल करून ऑनलाईन अपडेट करा – Update Aadhaar Online on MyAadhaar Portal

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.