FRI प्रणाली म्हणजे काय? जाणून घ्या तुमचे पैसे सुरक्षित ठेवणारी ही नवी यंत्रणा!
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने डिजिटल होत असताना, सायबर फसवणूक ही एक गंभीर समस्या बनली आहे. इंटरनेट, मोबाइल बँकिंग, यूपीआय अशा सुविधा सामान्य लोकांच्या जीवनाचा भाग झाल्या असतानाच, फसवणूक करणारे देखील अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने नागरिकांची फसवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर, आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (FRAUD RISK INDICATOR – FRI System) ही संकल्पना सायबर फसवणूक रोखण्यासाठी एक क्रांतिकारी उपाय ठरत आहे.
काय आहे आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (एफआरआय)? FRI System:
मे 2025 मध्ये दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजन्स युनिट (DIU) ने सुरू केलेली एफआरआय (FRI System) प्रणाली एक जोखमीवर आधारित मूल्यांकन प्रणाली आहे. यामध्ये एखाद्या मोबाइल क्रमांकास सायबर फसवणुकीशी संबंधित जोखीम श्रेणीत वर्गीकृत केले जाते – न्यून, मध्यम, उच्च किंवा अतिउच्च जोखीम. ही जोखीम मूल्यांकन अनेक स्त्रोतांकडून आलेल्या माहितीनुसार ठरवली जाते:
इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C)
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP)
बँका, एनबीएफसी व यूपीआय सेवा प्रदाते
दूरसंचार कंपन्या आणि त्यांचा “चतु:सूत्री मंच”
या सगळ्यांची मिळून तयार झालेली माहिती एकत्र करून, (FRI System) प्रणाली त्या मोबाइल क्रमांकास सायबर फसवणूकशी जोडलेले धोके किती आहेत हे अधोरेखित करते.
बँकांनी FRI प्रणाली एकत्रित का करावी?
2 जुलै 2025 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व अनुसूचित बँका, लघुवित्त बँका, पेमेंट बँका व सहकारी बँकांना (FRI System) प्रणालीस त्यांच्या इंटरनल सिस्टीमसोबत एकत्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
यामुळे:
संशयास्पद व्यवहारांवर लगेच कारवाई करता येते.
सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या मोबाइल नंबरची तपासणी रिअल टाइममध्ये करता येते.
बँक ग्राहकांना सावध करणे, व्यवहार थांबवणे किंवा विलंबित करणे यासारख्या उपाययोजना तत्काळ घेता येतात.
जोखीम असलेल्या नंबरवरून येणाऱ्या व्यवहारांना ब्लॉक करता येते.
डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक सुरक्षित व पारदर्शक होते.
एफआरआय प्रणालीचा उपयोग कसा होतो?
एफआरआय (FRI System) प्रणालीतील माहिती बँकांच्या API प्रणालीशी जोडली जाते. बँकांमध्ये एखादा व्यवहार सुरू होण्याच्या अगोदर त्या मोबाइल नंबरचा जोखीम स्तर (Risk Level) तपासला जातो. जर तो ‘उच्च’ किंवा ‘अतिउच्च’ श्रेणीत असेल, तर:
बँक तो व्यवहार स्थगित करू शकते.
ग्राहकास तात्काळ इशारा दिला जातो.
गरज असल्यास व्यवहार पूर्ण होण्याआधीच ब्लॉक केला जातो.
कोणत्या बँकांनी FRI प्रणालीचा आधीच वापर सुरू केला आहे?
काही आघाडीच्या बँकांनी व पेमेंट प्लॅटफॉर्म्सनी आधीच एफआरआय (FRI System) प्रणाली वापरून सकारात्मक अनुभव घेतले आहेत:
फोनपे
पेटीएम
HDFC बँक
आयसीआयसीआय बँक
पंजाब नॅशनल बँक
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
हे संस्थान एफआरआय (FRI System) चा प्रभावीपणे उपयोग करत असून, त्यांच्या ग्राहकांची सायबर फसवणुकीपासून मोठ्या प्रमाणात रक्षा झाली आहे.
एफआरआय (FRI System) प्रणालीमुळे काय फायदे होतील?
सायबर फसवणूक टाळता येईल: सायबर गुन्हेगार जे मोबाइल नंबर वापरून सामान्य लोकांना फसवत होते, त्यांची एफआरआय (FRI System) प्रणालीत नोंद जाईल आणि त्यांच्या नंबरवरून येणारे व्यवहार थांबवता येतील.
ग्राहकांची सुरक्षा: बँक ग्राहकांना धोका असलेल्या व्यवहारांविषयी तत्काळ इशारे मिळतील.
वेळेत कारवाई: बँका आणि सुरक्षा संस्था रिअल टाइममध्ये फसवणुकीविरोधात कारवाई करू शकतील.
आंतर-एजन्सी समन्वय: एफआरआय (FRI System) प्रणालीद्वारे टेलिकॉम आणि आर्थिक क्षेत्रातील एजन्सीज एकत्रितपणे काम करतील.
डिजिटल पेमेंट्समध्ये विश्वास: लोकांचा डिजिटल व्यवहारांवर विश्वास अधिक दृढ होईल, ज्यामुळे डिजिटल इंडिया व्हिजनला गती मिळेल.
मोबाइल क्रमांकांची निगराणी:
डिजिटल इंटेलिजन्स युनिट वेळोवेळी मोबाइल नंबर रेप्युटेशन लिस्ट (MNRL) तयार करून सहभागी संस्थांसोबत शेअर करते. या यादीत असे क्रमांक असतात:
जे फसवणूक प्रकरणांत सहभागी आढळले.
जे पुन्हा-पुन्हा KYC अपडेट न करता वापरले गेले.
जे सायबर गुन्ह्यांशी संबंधित आहेत.
हे क्रमांक बँकांना व्यवहार थांबवण्यासाठी आणि ग्राहक संरक्षक उपाययोजना आखण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.
आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक एफआरआय (FRI System) ही एक नवोन्मेषी, डेटा-आधारित आणि संयुक्त सहभागातून तयार झालेली यंत्रणा आहे. यामुळे बँका, पेमेंट गेटवे व सरकार एकत्र येऊन सायबर फसवणुकीविरोधात प्रभावी लढा देऊ शकतात. एफआरआय (FRI System) प्रणाली केवळ एक तांत्रिक नवकल्पना नसून, ही एक सामूहिक उत्तरदायित्वाची यंत्रणा आहे, जी भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवते.
या लेखात, आम्ही एफआरआय (FRI System) प्रणाली म्हणजे काय? तुमचे पैसे सुरक्षित ठेवणारी ही नवी यंत्रणा! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी हेल्पलाईन, वेब पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन !
- डेबिट / क्रेडिट कार्ड हरवलं,चोरले किंवा हॅक झालं तर काय करायचे?
- Bank Fraud : ऑनलाईन बँक फसवणूक झालेय 10 दिवसात पूर्ण परतावा मिळवा, फक्त या RBI मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा!
- महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प : 14407 हेल्पलाईन नंबरद्वारे सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण होणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!