बँकिंग आणि फायनान्सवृत्त विशेष

ICICI बँक ATM पिन कसा सेट करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

ICICI बँके मध्ये ग्राहकांनी बचत किंवा चालू खाते उघडल्यानंतर त्यांना एटीएम कार्ड दिले जाते. आपले बँक खाते सुरक्षित करण्यासाठी डेबिट कार्ड/एटीएम पिन तयार करणे आणि व्यवहार करण्यासाठी आयसीआयसीआय डेबिट कार्ड सक्रिय करणे महत्त्वाचे आहे. आयसीआयसीआय एटीएम पिन जनरेट प्रक्रिया एटीएम, ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा कस्टमर केअर द्वारे देखील केली जाऊ शकते.

 ICICI बँक एटीएम चा पिन जनरेट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

१) iMobile अँप मधून पिन जनरेट करा:

 • iMobile अँप वर लॉगिन करा.
 • सेवा, कार्ड पिन सेवा, Generate Debit Card PIN वर क्लिक करा.
 • तुमचा खाते क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक निवडा आणि CVV नंबर टाका.
 • तुमच्या पसंतीचा 4 अंकी डेबिट कार्ड पिन एंटर करा व ‘सबमिट’ करा.

२) इंटरनेट बँकिंग मधून पिन जनरेट करा:

 • तुमच्या आयसीआयसीआय बँक इंटरनेट बँकिंग खात्यात तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
 • ‘कार्डे आणि कर्जे’ वर क्लिक करा.
 • ‘डेबिट/एटीएम कार्ड’ वर क्लिक करा.
 • Generate PIN‘ वर क्लिक करा.
 • तुमच्या खात्याशी लिंक केलेल्या डेबिट कार्डांच्या सूचीमधून तुमचा डेबिट कार्ड नंबर निवडा.
 • स्वाक्षरी पॅनलजवळ कार्डच्या मागील बाजूस छापलेला 3 अंकी CVV क्रमांक प्रविष्ट करा.
 • कार्डच्या मागील बाजूस छापलेली grid values टाका.
 • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
 • पृष्ठावरील OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
 • तुमचा नवीन एटीएम पिन तयार करा.

३) एटीएम मधून पिन जनरेट करा:

 • जवळच्या ATM ला भेट द्या.
 • Generate ATM PIN‘ पर्याय निवडा आणि ‘ओटीपी जनरेट करा’ वर क्लिक करा.
 • तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा आणि ‘होय’ निवडा.
 • तुमची जन्मतारीख एंटर करा आणि ‘होय’ निवडा.
 • ““Already have on OTP” पर्याय निवडा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाका.
 • तुमच्या पसंतीचा 4 अंकी डेबिट कार्ड पिन एंटर करा.

४) कस्टमर केअर द्वारे पिन जनरेट करा:

 • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून आमच्या कस्टमर केअरला कॉल करा आणि ‘बँकिंग खाते’ निवडा.
 • Generate debit card PIN‘ पर्याय निवडा आणि तुमचा 16 अंकी डेबिट कार्ड नंबर टाका.
 • पुढील तपशील एंटर करा म्हणजे कार्ड एक्सपायरी तारीख, CVV आणि प्राथमिक खातेदाराची जन्मतारीख
 • तुमच्या आवडीचा 4 अंकी डेबिट कार्ड पिन एंटर करा आणि ‘सबमिट’ निवडा
 • Generate PIN‘ निवडा, तपशील प्रविष्ट करा आणि पिन तयार करा.

हेही वाचा – डेबिट / क्रेडिट कार्ड हरवलं,चोरले किंवा हॅक झालं तर काय करायचे? What to do if debit / credit card is lost, stolen or hacked?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.