वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून “१०० टक्के गावात १०० टक्के घरांसाठी शोषखड्डे”

केंद्र शासनाने सन 2019 पासून “जलशक्ती अभियान”राबविण्यास सुरुवात केली असून, जलशक्ती अभियान मोहिमेअंतर्गत जलसंधारण व भूजल पुनर्भरण यासंबंधीची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलशक्ति अभियान राबविण्यासाठी दि.२२ मार्च, २०२१ च्या शासन परिपत्रकान्वये करावयाच्या कामासंबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत.

सदर परिपत्रकात राज्यातील १०० टक्के गावात १०० टक्के घरांसाठी शोषखड्डे तयार करण्याबाबत सूचित केलेले आहे. प्रत्येक गावातून १०० टक्के घरांमध्ये शोषखड्डे करावयाचे असल्याने अशा सर्व १०० टक्के कुटुंबांना जॉब कार्ड द्यावेत. तसेच, ज्या ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी आवश्यक असेल त्याप्रमाणे सामुदायिक शोषखड्डे ही तयार करण्यात यावेत. तयार होणाऱ्या शोषखड्डयांची प्रचलित पद्धतीने नोंद घेण्यात यावी असा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून “१०० टक्के गावात १०० टक्के घरांसाठी शोषखड्डे”:

सर्वसाधारणपणे गावातील प्रत्येक घरांमधून नियमित वापरलेले पाणी/सांडपाणी हे उघडयावरून नालीमध्ये सोडले जाते. त्यामुळे गावात, रस्त्यावर ठीकठिकाणी पाणी साचून राहते व त्यामुळे दुर्गंधी, डास निर्माण होतात. या दूषित पाण्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण होते. परंतु प्रत्येक गावातील प्रत्येक घराजवळ एक शोषखड्डा बांधून त्यात सांडपाणी, घराच्या छपरावरील पावसाचे पाणी सोडल्यास त्याचे खालीलप्रमाणे फायदे होतात.

१) घराजवळील उघड्यावरील सांडपाणी संपल्याने डासांची उत्पत्ती व प्रादुर्भाव पूर्णपणे बंद होऊन अनेक साथीच्या आजारांवर नियंत्रण आणता येईल.

२) भुगर्भामध्ये गारवा तयार होऊन न क्लाऊड प्रक्रिया झाल्याने पावसाच्या प्रमाणात वाढ होईल.

३) जलसंधारण होण्यासाठी शोषखड्डे हे एक शाश्वत प्रभावी साधन निर्माण होईल.

प्रत्येक गावातील प्रत्येक घराजवळ १०० टक्के शोषखड्डे तयार करण्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार शोषखड्ड्यांचे आकारमान बदलावे लागेल. तसेच शोषखड्डयाच्या बदललेल्या आकारमानानुसार सिमेंटची टाकी/प्लॅस्टिकची टाकी किंवा टाकीशिवाय वीट आणि दगड टाकून शोषखड्डा तयार करण्यात यावा. तथापि, टाकी शिवाय शोषखड्डे करणे टाळावे.

टाकीचा पर्याय उपलब्ध नसेल तरच वीट आणि दगडाचे शोषखड्डे तयार करण्यात यावेत. जागेच्या उपलब्धतेनुसार वैयक्तिक शोषखड्डे तसेच सामूहिक शोषखड्डे तयार करण्यासाठी शोष खड्ड्यांचे आकारमान खाली दिलेल्या शासन निर्णयाच्या परिशिष्ट 1 मध्ये दिलेले आहेत. तसेच, त्यासाठीचे टाईप इस्टीमेंट परिशिष्ट दोन मध्ये दिलेले आहेत. त्यानुसार शोषखड्डे तयार करण्यात यावेत.

शोषखड्डा कुठे करावा: १) वरच्या भागात माती, खालच्या भागात मुरूम असेल त्या ठिकाणी २) पूर्ण मुरुमाचा भाग असेल त्या ठिकाणी.

शोषखड्डा कुठे करू नये: १) काळी चिकन माती असेल त्या ठिकाणी २) खडक असेल त्या ठिकाणी ३) विहीर व बोअर वेल च्या जवळ (किमान दहा मीटर अंतर राखून करण्यास हरकत नाही.)

राज्यातील 22 जिल्ह्यांमधील एकूण 143 गट हे शंभर टक्के तीव्र पाणीटंचाई असलेले आहेत. या सर्व 143 गटातील 100% गावातील 100% घराजवळ वैयक्तिक शोषखड्डे तसेच आवश्यक असेल तेथे सामुदायिक शोषखड्डे सुद्धा तयार करण्यात यावेत. या 143 पलीकडील गटांमध्ये अधिकाधिक गावांमध्ये 100% घराजवळ शोषखड्डे करण्यात यावे. या दोन्ही बाबींचा गुगल फॉर्म द्वारे पाठपुरावा करण्यात येईल.

राज्यातील काही गावांमध्ये 100% शोषखड्डे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना झालेल्या व यापुढेही निरंतर फायदा होत असलेल्या तीन गावांची माहिती उदाहरणादाखल खाली दिलेल्या शासन निर्णया मध्ये देण्यात येत आहे. जेणेकरून शोषखड्डे तयार करण्याची गरज आवश्यक असल्याची समाजामध्ये जाणीव निर्माण होईल व यातून एक प्रकारची लोकचळवळ उभी राहू शकेल.

हेही वाचा – शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून “१०० टक्के गावात १०० टक्के घरांसाठी शोषखड्डे”

  • Nitesh Pilane

    any government GR for above content

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.