घरकुल योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; पात्र कुटुंबांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC-२०११) मध्ये व प्राधान्यक्रम यादी (GPL) मध्ये समाविष्ट नव्हते, अशा पात्र कुटुंबासाठी सप्टेंबर, २०१८ मार्च २०१९ मध्ये आवास प्लस (प्रपत्र-ड) सर्वेक्षण करण्यात आले.

त्यामध्ये राज्यात ५७,६०,०५६ कुटुंबांची आवास प्लस ॲप मार्फत नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १०.८४,५७५ कुटुंबे सिस्टमद्वारे अपात्र ठरविण्यात आली व ४४,११,६७७ पात्र कुटुंबांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी आवास सॉफ्टवर उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यापैकी अनुसूचित जाती ४.८९,५६२/ अनुसूचित जमाती ८.१९.९५९, अल्पसंख्याक २,१७,०२४, इतर २८,८५,१३२ इतके लाभार्थी आहेत.

तसेच काही तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे आवास प्लस सर्वेक्षण झाले नाही, अशा कुटुंबांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्राधान्यक्रम यादीमध्ये नाव नसलेल्या परंतु पात्र असलेल्या कुटुंबांना राज्य पुरस्कृत विविध योजनांद्वारे लाभ देण्यात येतो.

परंतु इतर संवगांतील कुटुंबासाठी राज्य शासनामार्फत कुठलीही योजना राबविण्यात येत नाही. या संवर्गासाठी नवीन योजना राबविण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. यास्तव प्रत्येक जिल्हयातील इतर संवर्गातील कुटुंबांची माहिती दिलेल्या विहित नमुन्यात तात्काळ सादर करण्यात यावी, अशी विनंती राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण विभागाने केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; पात्र कुटुंबांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक:

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; पात्र कुटुंबांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.