स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत अनुदान निधी वितरीत – २०२२-२३
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. वित्त विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकास अनुलक्षून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२२-२३ मध्ये राबविण्यासाठी रु. १०४५०.०० लक्ष इतक्या निधीच्या कार्यक्रमास खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता संचालक (फलोत्पादन), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ४ येथील पत्रान्वये सन २०२२-२३ करिता निधी वितरीत करण्याबाबत विनंती केली आहे. त्यास अनुलक्षून सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषि आयुक्तालयास वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत अनुदान निधी वितरीत – २०२२-२३:
१) राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन २०२२-२३ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा रु. ४२००.०० लक्ष रुपये बेचाळीस कोटी फक्त) इतका निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
२) सदरचा निधी खालील लेखाशीर्षांतर्गत चालू वर्षी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.
मागणी क्र. टी-३
२४०१ पिक संवर्धन
११९, फलोत्पादन व भाजीपाला पिके,
(०१) (३३) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,
३३ – अर्थसहाय्य, ( २४०१ A८८९)
या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या रक्कमेचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
चालू वर्षी या योजनेंतर्गत उपलब्ध करुन दिलेला निधी प्रथम प्रलंबित दायित्वाच्या अदागयीसाठी वापरण्यात यावा. तद्नंतर उर्वरित निधी चालू वर्षासाठी वापरावा.
सदर योजनेची खालील शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक १ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी तसेच वेळोवेळी केलेल्या सुधारणाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी.
संचालक (फलोत्पादन) यांनी सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा वेळोवेळी घ्यावा व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी आयुक्त (कृषी) यांचेमार्फत शासनास सादर करावा.
सदर योजनेंतर्गत निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित अटी व शर्ती वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
प्रस्तुत आदेश वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: अर्थसं-२०२२/प्र.क्र. ४३ /अर्थ-३, दिनांक ०४ एप्रिल, २०२२ नुसार विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभाग शासन निर्णय : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा रु.४२००.०० लाख एवढा निधी कृषि आयुक्तालयास वितरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – महाडीबीटी पोर्टलवर फळबाग लागवड अनुदान (फलोत्पादन) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!