आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

बारावीचा निकाल लागला पहा येथे! – Maharashtra HSC Results 2022 LIVE

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) परीक्षा सन २०२२ चा निकाल दि. ८ जून २०२२ रोजी दुपारी १ वा. लागणार आहे, तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.  यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

मंडळामार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे – HSC Result 2022:

https://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

https://hsc.mahresults.org.in

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

https://indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://lokmat.news18.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे:

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते सोमवार , दिनांक २०/०६/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते बुधवार , दिनांक २९/०६/२०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Curd/ UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.

२) मार्च – एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) मार्च – एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै – ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक १०/६/२०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

५) मार्च – एप्रिल २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दि. १७/६/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ १२ वी ) मार्च -एप्रिल २०२२ च्या निकालाबाबतचे सूचना पत्रक: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ १२ वी ) मार्च -एप्रिल २०२२ च्या निकालाबाबतचे सूचना पत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आता व्हॉट्सॲप वर डाउनलोड करता येणार तुमची सरकारी कागदपत्रे – Download your Government documents on WhatsApp

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.