80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्ति वेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ !
८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ दि.०१.०१.२०१९ पासून सुधारित करण्यात आला आहे. शासन आता असा आदेश देत आहे की, सदर दर दि.०१.०१.२०२४ पासून पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत.
1 | वय वर्षे ८० ते ८५ | मूळ निवृत्तिवेतनात २०% वाढ |
2 | वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ते ९० | मूळ निवृत्तिवेतनात ३०% वाढ |
3 | वय वर्षे ९० पेक्षा अधिक ते ९५ | मूळ निवृत्तिवेतनात ४०% वाढ |
4 | वय वर्षे ९५ पेक्षा अधिक ते १०० | मूळ निवृत्तिवेतनात ५०% वाढ |
5 | वय वर्षे १०० पेक्षा अधिक | मूळ निवृत्तिवेतनात १००% वाढ |
सदर लाभ केवळ दि.०१.०१.२०२४ पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.
या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तिवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी यांची राहणार आहे.
वित्त विभाग शासन निर्णय: 80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – राष्ट्रीय वयोश्री योजना – Rashtriya Vayoshri Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!