वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – ITI Admission Online 2023

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२३ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर “माहितीपुस्तिका प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – ITI Admission Online 2023:

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. १२ जून २०२३ पासुन रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी औ. प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी.

अर्ज करण्याची पध्दत :-

१. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रीयेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्विकृती केंद्र असतील. अर्ज स्विकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे / पडताळणी / स्विकृती आणि निश्चिती करु शकतील.

२. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.

३. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल सर्व औ. प्र संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

४. प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही.

५. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.

६.उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन “Admission Activities” या मथळ्याखाली “Application Form वर क्लिक करुन संपुर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनञ्चः तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातुन जमा करावे.

७. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल.

८. प्रवेश अर्ज शुल्क :

  • राखीव प्रवर्ग ( Reserved Category):  रु१००
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State) : रु.३००
  • अराखीव प्रवर्ग (अनारिक्षित वर्ग) : रु १५०
  • अनिवासी भारतीय (अनिवासी भारतीय) : रु.५००

९. उमेदवाराने संपुर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत (Print Qut) घ्यावी.

१०. प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation):

१०.१. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती/ दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मुळ दस्तऐवज / कागदपत्रे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा (Photocopy) एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) नजिकच्या औ.प्र. संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र- ३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

१०.२. अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज / कागदपत्रांप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास “अर्ज निश्चितीकरण पावती” (Application Confirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील.

१०.३. अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करतील.

१०.४. उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औ.प्र. संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही.

१०.५. प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औ. प्र. संस्था मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरीत मदत कक्षास संपर्क साधावा.

११. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.

१२. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रदेश खात्यात प्रवेश (Login) करून तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.

१३. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रदेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रदेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration Number) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/Change Options/Preferences व्दारे सादर करावेत. )

१४. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापील प्रत (Print Out ) घ्यावी.

१५. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रकीयेतून बाद होईल.

१६. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखिल दि. १२ जून २०२३ पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे..

१७. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Letter) Online उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या Account ला Login करून निवडपत्राची प्रिंट घेवून निवड झालेल्या औ. प्र. संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. उमेदवारांना निवडपत्राची (Allotment Letter) छापील प्रत (Print Out) ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखिल घेता येईल.

१८. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातिल दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे संबंधीत संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे सादर करु न शकल्यास व/वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतून बाद करण्यात येईल.

प्रवेशाचे वेळापत्रक :-

अ.क्र.प्रवेश प्रक्रीयेचा तपशीलप्रारंभ दिनांकअंतिम तारीख
१.ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे
१.१ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे.१२ जून २०२३ स. ११.०० वाजेपासून११ जुलै, २०२३ सायं. ५.०० वाजेपर्यंत
२.प्रवेश अर्ज निश्चित करणे
२.१अर्ज स्विकृती केंद्रात (राज्यातील शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित (Confirmation) करणे१९ जून, २०२३ स. ११.०० वाजेपासून११ जुलै, २०२३ सायं. ५.०० वाजेपर्यंत
३.पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे अर्ज निश्चित करणे
३.१प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन सादर करणे१९ जून, २०२३ स. ११.०० वाजेपासून१२ जुलै, २०२३ सायं. ५.०० वाजेपर्यंत
४.प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
४.१.प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व उमेदवारांना SMS व्दारे कळविणे.१३ जुलै, २०२३ स. ११.०० वाजता
५.गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे
५.१गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या Helpline क्रमांक, नजिकच्या शासकीय श्री. प्र. संस्था वा ई-मेल व्दारे उमेदवार हरकती नोंदविणे, प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करावयाचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करून तसा बदल करणे तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.१३ जुलै, २०२३ स. ११.०० वाजेपासून१४ जुलै, २०२३. सायं. ५.०० वाजेपर्यंत
६.अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
६.१अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व उमेदवारांना SMS व्दारे कळविणे.१६ जुलै, २०२३ सायं. ५.०० वाजेपर्यंत
७.पहिली प्रवेश फेरी
७.१पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व उमेदवारांना SMS व्दारे कळविणे२० जुलै २०२३ सायं. ५.०० वाजेपर्यंत
७.२पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प क्र. २ ते १०० मधुन जागा वाटप झाली आहे. त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करु शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होवू शकणार नाहीत.२१ जुलै, २०२३ स. ९.०० वाजेपासून२५ जुलै, २०१३ सायं. ५.०० वाजेपर्यंत

ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज  – ITI Admission Online Form: ITI प्रवेशसाठी खालील पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.

https://admission.dvet.gov.in

हेही वाचा – इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.