वृत्त विशेषमहसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

वन महोत्सव/वृक्ष लागवड अनुदान योजना २०२३-२४ : अनुदानावर सर्व प्रकारची रोप/कलम

दि. १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. त्यानुसार संदर्भ क्र. (३) येथील दिनांक २० जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२-२३ साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वन महोत्सव/वृक्ष लागवड अनुदान योजना २०२३-२४ : अनुदानावर सर्व प्रकारची रोप/कलम:

सन २०२२-२३ या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेवून, ही योजना सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात दिनांक १५ जून, २०२३ ते ३० सप्टेंबर, २०२३ या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात सन २०१७ पासून ” ५० कोटी वृक्ष लागवड” हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढे ही चालू राहावा व या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहीक पडीक क्षेत्र, व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा तसेच सर्व सामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येईल. चालू पॉलिबॅगचे आकारमान, मिश्रण वर्षी रोपे निर्मिती करतेवेळी, बियाणांचा स्त्रोत, बियाणांची प्रतवारी व उपचार, (Potting Mixture), रोपांची विरळणी, रोपांची सुदृढता या सर्व मानकांचा विचार करून रोपे तयार करण्यात येत असल्यामुळे त्याप्रमाणे रोपांची प्रतवारी निश्चित करून वन महोत्सवाच्या कालावधीत आणि सर्वसाधारण कालावधीत रोपांचा पुरवठा सन २०२३ २४ याआर्थिक वर्षात खाली नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.रोपांचे वर्गीकरणरोपांची प्रतवारीवन महोत्सव कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप (रुपये)सर्वसाधारण कालावधीत प्रति रोपाचा दर (रुपये)
12345
19 महिन्यांचे रोपA2031
B1225
C1023
218 महिन्यांचे रोपA5079
B3063
C2557
318 महिन्यांचे वरील रोपA65135
B50103
C4092

राज्यात सन २०२३ च्या पावसाळ्यात दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करणेसाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा, यासाठी वरीलप्रमाणे सवलतीचे दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.

ज्या शासकीय यंत्रणांना, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना वृक्ष लागवड करावयाची आहे, अशा यंत्रणांकडे रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्यास, अशा यंत्रणांना या वन महोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा संबंधित रोपवाटिकेत केला जाईल. यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांचेकडे सोबतच्या मागणी पत्राद्वारे करावी.

उपवनसंरक्षक (प्रादेशिक) / विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग हे जिल्ह्यात उपलब्ध प्रादेशिक / सामाजिक वनीकरण रोपवाटिकेमधून यंत्रणानिहाय / मागणीदार यांना रोप पुरवठ्याचे आदेश निर्गमित करतील व इतर यंत्रणेशी योग्य समन्वय साधतील.

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होणेकरिता व या कार्यात त्यांचा अधिकाअधिक सहभाग मिळवण्याकरिता आणि अशा शाळा व महाविद्यालयांच्या परिसरांभोवती संरक्षक भिंती असल्याने रोपांचे संरक्षण व संवर्धन होणे सोयीचे असल्याने वृक्ष लागवड करू इच्छिणारी खाजगी विना अनुदानित विद्यालये/ महाविद्यालये यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांचेसाठी नाममात्र प्रति रोप दर रु. १ राहील. मात्र त्यापुढील रोपांच्या संख्येकरिता खालीलप्रमाणे दर राहतील.

अ. क्र.रोपांचे वर्गीकरणरोपांची प्रतवारीवन महोत्सव कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप (रुपये)सर्वसाधारण कालावधीत प्रति रोपाचा दर (रुपये)
१०० रोपांकरिताचा दर१०१ ते ५०० रोपांकरिताचा दर
123456
19 महिन्यांचे रोपA12031
B11225
C11023
218 महिन्यांचे रोपA15079
B13063
C12557
318 महिन्यांचे वरील रोपA165135
B150103
C14092

शासकीय यंत्रणा किंवा इतर संस्था यांना जर रोपे लागवड शासकीय जागेत करावयाची असल्यास त्यांचेकडे त्या करिता निधी उपलब्ध नसल्यास लागवड करणारी शासकीय संस्था किंवा इतर संस्था व शासकीय जागाधारक संस्था यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना या वन महोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा प्रति हेक्टरी एक हजार या मर्यादेपर्यंत (१०००) किंवा त्यापेक्षा कमी (मागणीनुसार) करण्यात येईल. सदर संस्थांना पुरवठा करण्यात आलेल्या रोपांच्या लागवडीची माहिती संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण / वन परिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक यांचेकडे देणे बंधनकारक राहील. तसेच संस्थांची मागणी असल्यास व शासकीय रोपवाटिकेत रोपे उपलब्ध असल्यास वनमहोत्सव कालावधी व्यतिरिक्त सर्वसाधारण कालावधीमध्ये देखील सदरील तरतूद लागू राहील.

वन महोत्सव काळात वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा केला जातो. या योजनेचा फायदा सर्व संबंधित विभागांनी घ्यावा. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्याबाबतची आवश्यक नोंद आणि लेखा, रोपे उपलब्ध करून घेणारा विभाग आणि रोपे उपलब्ध करून देणारा विभाग अशा दोन्ही विभागामार्फत ठेवण्यात यावे. याबाबतची माहिती व अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचेकडे पाठवावी.

वन महोत्सवाच्या कालावधीत (दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर) वन महोत्सवाचे प्रयोजन व महत्व याबाबत प्रभावीपणे सर्वदूर पोहोचणाऱ्या माध्यमातून योग्य प्रसिद्धी देण्यात यावी. याबाबतचा खर्च “मागणी क्रमांक सी-७, मुख्य लेखाशीर्ष- २४०६ वनीकरण व वन्यजीवन- १०१ – वन संरक्षक व विकास व पुननिर्मित- (११) (३४) (२४०६ ८५५१) (योजनेंतर्गत) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सन २०२३ २४ वर्षाकरिता मंजूर केलेल्या निधीतून मागविण्यात यावा.

उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांनी विक्रीतून एकूण जमा झालेला महसूल याबाबत चालू आर्थिक वर्षाचा तपशील सोबतच्या विहित नमुन्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना सादर करावा.

रोप मागणी पत्र-अर्ज नमुना: वन महोत्सव/वृक्ष लागवड अनुदान योजना २०२३-२४ : अनुदानावर सर्व प्रकारची कलम/रोप मागणी पत्र-अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

महसूल व वन विभाग शासन निर्णय : वन महोत्सव २०२३-२४ वन महोत्सव कालावधीत वाटप करावयाच्या रोपांचे विक्रीचे दर निश्चित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.