महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
आपण या लेखात शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. अर्ज एक योजना अनेक” या धर्तीवर विकसित केलेले आपले सरकार महाडीबीटी पोर्टल हा कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेला एक अग्रगण्य उपक्रम आहे. त्यानुसार विविध योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी एकाच अर्जामध्ये अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात.
महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे ! – MahaDBT Farmer Scheme Documents:
शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) कोणती आहेत ते सविस्तर पाहूया.
महाडीबीटी शेतकरी योजना कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया:
mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
शेतकरी नोंदणी करून लॉगिन करा.
आवश्यक योजना निवडा.
लॉटरीत निवड झाल्यानंतर सूचना मिळतील.
दिलेल्या मुदतीत सर्व कागदपत्रे PDF / Scan करून अपलोड करा.
सबमिट केल्यानंतर अर्ज स्थिती “Submitted” दिसेल.
१) ठिबक/तुषार सिंचन:
निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 -अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र
पूर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ देयक (पुर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) परिशिष्ट -6 (संकल्प आराखडा व प्रमाणपत्र)
3) परिशिष्ट -6 (हमीपत्र)
२) कांदाचाळ/शेडनेट/पॅकहाऊस/ड्रॅगन फ्रुट, अव्होकॅडो लागवड:
निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र
5) प्रकल्प आराखडा
पुर्व संमती मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
१) कांदाचाळ/शेडनेट/पॅकहाऊस साठी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करुन मुळ देयके (पूर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे) (जीएसटी बिल)
२) ड्रॅगन फुट, अव्होकॅडो लागवड यासाठी रोपे खरेदीचे नोंदणीकृत रोपवाटीकेचे देयक
३) ट्रॅक्टर:
निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र
5) ट्रॅक्टरचे कोटेशन
6) मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा परिक्षण अहवाल घटक
पुर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ देयक (पूर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) खरेदी रक्कम RTGS द्वारे डिलरकडे जमा केल्याची पावती
3) ट्रॅक्टर विमा पावती
4) ट्रॅक्टर RTO नोंदणी पावती
४) कृषि अवजारे:
निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/ जमाती प्रवर्गातील असेल तर अधिका-याचे प्रमाणपत्र
5) ज्या अवजारासाठी निवड झाली त्याचे कोटेशन
6) मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा परिक्षण अहवाल
पूर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ देयक (पूर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) खरेदी रक्कम RTGS द्वारे डिलरकडे जमा केल्याची पावती
५) शेततळे अस्तरीकरण/शेततळे/पंपसंच/पीव्हीसी पाईप:
निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मूळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र
पुर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे
1) मुळ देयक ( पुर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) खरेदी रक्कम RIGS द्वारे डिलरकडे जमा केल्याची पावती
महाडीबीटी शेतकरी योजना कागदपत्रे अपलोड करताना लक्षात ठेवायच्या टिप्स
- कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय असावीत.
- PDF फाईल 1 MB पेक्षा कमी असावी.
- सर्व कागदपत्रांची मूळ प्रत जवळ ठेवा.
- वेळेत अपलोड न केल्यास अर्ज बाद होतो.
वरील प्रमाणे महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) अपलोड करावयाची आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र.1: महाडीबीटी शेतकरी योजना कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत?
उ. मूळ 7/12 उतारा, 8A उतारा, संमतीपत्र, जातीचे प्रमाणपत्र, प्रकल्प आराखडा, कोटेशन व मूळ देयके आवश्यक असतात.
प्र.2: कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) कधी अपलोड करावी लागतात?
उ. लॉटरीत निवड झाल्यानंतर 10 दिवसांत प्राथमिक व 30-45 दिवसांत अंतिम कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) अपलोड करावी लागतात.
प्र.3: RTGS पावती का आवश्यक आहे?
उ. कारण अनुदान देण्यासाठी खरी खरेदी झाली आहे हे प्रमाण RTGS पावतीतून मिळते.
प्र.4: सामाईक 7/12 असल्यास काय करावे?
उ. इतर भागधारकांचे संमतीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
प्र.5: मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा?
उ. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा महाडीबीटी हेल्पलाइन 022-49150800 वर संपर्क साधावा.
महाडीबीटी शेतकरी योजना (MahaDBT Farmer Scheme Documents) कागदपत्रे योग्य वेळी व व्यवस्थित अपलोड करणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान मिळते. त्यामुळे वेळेत अर्ज करा, योग्य कागदपत्रे अपलोड करा आणि शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ घ्या.
महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची (MahaDBT Farmer Scheme Documents) कागदपत्रे ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
- महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!