वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनासरकारी योजना

MahaDBT Farmer Scheme 2024 : बियाणे, खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करा !

कृषि विभागाच्या महा-डीबीटी पोर्टलवर (MahaDBT Farmer Scheme) बियाणे खते वाटपाच्या अनुदानासाठी  अर्ज सुरू झाले आहेत. सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात, गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१४-१५ पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

बियाणे, खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करा ! MahaDBT Farmer Scheme:

सन २०१८-१९ पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अंतर्गत मका पिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरु केली आहेत. या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतव्यय निर्धारित केला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – महाडीबीटी (MahaDBT Farmer Scheme):

अनुदान:
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – महाडीबीटी (MahaDBT Farmer Scheme) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशके), या बाबींना अनुदान देण्यात येईल.
  • बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशके)
पात्रता:

1) केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे,

  • राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे).
  • राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे).
  • राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे.
  • राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
  • राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
  • अ) ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे).
  • ब) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे).
  • क) रागी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे).
  • ड) कापूस: (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, (नागपूर विभाग) – वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
  • इ) ऊस: (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड. (लातूर विभाग) – लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली.

जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी,कापूस,ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील.

2) कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय आहे.

3) शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

4) जर लाभार्थ्याला गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.

5) संबंधीत शेतक-याचे स्वतःचे नावे ७/१२८/अ उतारा असणे बंधनकारक राहील.

आवश्यक कागदपत्रे:
  • ७/१२ प्रमाणपत्र
  • ८-अ प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • हमीपत्र
  • पूर्वसंमती पत्र

बियाणे खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया – MahaDBT Farmer Scheme:

महा-डीबीटी (MahaDBT Farmer Scheme) चा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. खालील संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आधार क्रमांक टाकून MahaDBT Farmer Scheme पोर्टल वर लॉगिन करा.

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन झाल्यावर सर्व वैयक्तिक तपशील भरा आणि पुढे आपल्याला “अर्ज करा” वर क्लिक करायचे आहे.

फॉर्मर लॉगिनच्या अर्जामध्ये विविध योजनेचे पर्याय आहेत, पण आपणाला बियाणे खते वाटपाच्या अनुदानासाठी “बियाणे, औषधे आणि खते” हा पर्याय निवडून “बाबी निवडा” वर क्लिक करा.

आता अर्जदारास तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जतन करा बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.

“सबमिट अप्लिकेशन” बटणावर क्लिक केल्यावर ते सबमिशनच्या पुष्टीकरणासाठी पॉप अप संदेश दर्शवितो. “ओके” बटणावर क्लिक केल्यावर ते पेमेंट वर पुनर्निर्देशित होईल जिथे अर्जदार पैसे भरण्यास सक्षम असेल.

मेक पेमेंट बटणावर क्लिक केल्यास ते पेमेंट गेटवे पोर्टलकडे पुनर्निर्देशित होईल. पेमेंट केल्यानंतर अर्जदार पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेऊ शकतो.

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडवण्यासाठी तसेच अन्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल अथवा एसएमएसद्वारे नोंदवून शासनाच्या गतिमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.