कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी

राज्यात शेतकरी हे शेती आणि शेतीशी निगडित कामांकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. तसेच विविध भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने, तसेच अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता या शेतीशी निगडित नुकसान भरपाई म्हणून राज्य शासन कर्ज मुक्तीची योजना अमलात आणली आणि आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभार्थ्यांची आठवी यादी जाहीर केली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, त्यांचे नाव अपात्र यादी मध्ये आहे. शेतकरी कर्ज माफी अपात्र असण्याचे कारण त्या यादी मध्ये दिलेले आहे.

शेतकरी कर्ज माफी अपात्र निकष:

१) तुम्ही शेती उत्पन्नाव्यतिरिक्त इन्कम टॅक्स रिटर्न/आयकर भरणाऱ्या व्यक्ती यांना लाभ मिळणार नाही. (Income tax payee)

२) तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी सुद्धा अपात्र आहात. केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून).

३) तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा अगोदरच लाभ घेतला असेल त्यांना लाभ मिळणार नाही.

४) आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार यांना लाभ मिळणार नाही.

५) सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी यांना लाभ मिळणार नाही.

६) २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती यांना लाभ मिळणार नाही.

७) शेतकऱ्याचे कर्ज हे ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि पुनर्गठीत पीक कर्ज असेल तरच होणार माफ.

८) राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी:

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी पाहण्यासाठी CSC सेंटर चालकांनी खालील डिजिटल सेवा पोर्टल वर लॉगिन करून Mahatma Jyotirao Fule Karjmukti Yojana असे सर्च टॅब मध्ये सर्च करा.

https://digitalseva.csc.gov.in

आता एक नवीन महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (MJPSKY) पोर्टल ओपन होईल त्यामध्ये Aadhar Authentication List Download या पर्यायावर क्लिक करा.

Aadhar Authentication List Download
Aadhar Authentication List Download

Aadhar Authentication List Download या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या जिल्ह्यातील CSC सेंटर असेल त्या जिल्ह्यातील गावातील तालुका/गावानुसार सर्व याद्या दिसतील. शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी पाहण्यासाठी यामध्ये तालुक्याचे नावExclusion असे लिहिले असेल त्यावर क्लिक करा आणि वरच्या डाउनलोड बटणवर क्लिक करा.

शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी
शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी

डाउनलोड बटणवर क्लिक केल्यानंतर त्या तालुक्याची शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी एक्सेल फाईल मध्ये डाउनलोड होईल. फाईल डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये अपात्र शेतकऱ्याचे नाव शोधून त्यामध्ये कोणत्या कारणासाठी अपात्र केला आहे ते कारण Exclusion Criteria या रकान्यात आपण पाहू शकतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांची शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन अपात्र यादी मध्ये नाव आहे का ते शोधून त्यामध्ये कोणत्या कारणासाठी अपात्र केला आहे ते आपण पाहू शकतो, जर ते अपात्र कारण योग्य नसेल तर त्याविरुद्ध संबंधित बँक किंवा तहसील कार्यालयात चौकशी करून दाद मागू शकता.

हेही वाचा – CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक – CSC – Digital Seva, Aaple Sarkar – MahaOnline

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.