महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना-शुद्धीपत्रक

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो.

तथापि, कोल्हापूर जिल्हयातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत मा. लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन, केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता, शासन कार्य नियमावली मधील कलम २९ (१) च्या तरतुदी नुसार उक्त योजनेच्या दि. २९.०७.२०२२ च्या शासन निर्णयातील (1) योजनेचा तपशील (३) यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याव्दारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

(1) योजनेचा तपशील –

सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि. ३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि.३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९- २० या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. ५० हजारांपेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयात वरीलप्रमाणे केलेल्या अंशतः बदलानुसार, उक्त योजनेंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्जखात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागांच्या अखत्यारीतील क्षेत्रिय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकांकडून तपासणी करुन व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्जखात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाकडील अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौसं. क्र.१८६/२०२४/व्यय-२, दि.२८.०२.२०२४ अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग :

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना-शुद्धीपत्रक शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.