वृत्त विशेष

मराठा तरुणांना ‘एसईबीसी’सोबतच नॉनक्रिमिलेअर दाखला मिळणार

राज्य सरकारने मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जातीच्या दाखल्यांसोबतच नॉनक्रिमिलेअरचे दाखले मिळणार आहेत. याचा फायदा पोलिस भरतीसह इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये उमेदवारांना होणार आहे. यामुळे दोन प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा वेळही वाचणार आहे.

मागील काही दिवसांत राज्य सरकारच्या पोर्टलवर २०१४ चा अध्यादेश (जीआर) असल्याने ‘एसईबीसी’चे दाखले देण्यास अडचणी येत होत्या. यामुळे पोलीस भरतीसह इतर सरकारी भरतीपासून मराठा तरुण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सरकारने पोलिस भरतीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाच्या आयटी विभागाने ‘एसईबीसी’चे अर्ज घेणे व प्रस्ताव मंजूर करण्याची प्रक्रिया थांबवली होती. यामध्ये ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रांच्या फॉरमॅटमध्ये मंत्रालयस्तरावरून बदल करण्यात येणार होते. आता नवीन बदलानुसार मराठा तरुणांना जातीच्या दाखल्यासह आता नॉनक्रिमिलेअरचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने नव्याने प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे.

कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या कर्जत प्रांत कार्यालयातून तांत्रिक अडचणीमुळे एकाही ‘एसईबीसी’ दाखल्याचे वाटप झाले नव्हते. परंतु, नवीन प्रस्तावानुसार कार्यालयाकडे एक प्रस्ताव आला असून, लवकरच दाखले वाटप सुरू होतील, असे प्रांत कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. नगर आणि नेवासा तालुक्याच्या नगर प्रांत कार्यालयातून आतापर्यंत ‘एसईबीसी’ सह नॉनक्रिमिलेअरचे ५५ दाखले देण्यात आल्याची माहिती प्रांत कार्यालयातून देण्यात आली आहे.

जातीच्या दाखल्यांसोबत नॉनक्रिमिलेअर

>
  • जातीचे प्रमाणपत्र घेताना नॉनक्रिमिलेअरची कागदपत्रे जोडा
  • तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
  • १९६७ पूर्वीचा जातीचा पुरावा
  • स्वतःचा शाळेचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • सेतूमधून ऑनलाइन फॉर्म

तांत्रिक अडचण दूर

  • शासनाच्या पोर्टलवर कोटनि रद्द केलेला २०१४चा ‘एसईबीसी’चा जीआर येत होता. नवीन २०२४ चा जीआर अपडेट नसल्याने दाखले देता येत नव्हते.
  • आता नवीन परिपत्रकात जातीच्या दाखल्यासोबत नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत.

गेल्या चार पाच दिवसांपासून ‘एसईबीसी’चे दाखले देण्याचे काम सुरु झाले आहे. शासनाच्या पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर झाली आहे.

हेही वाचा – जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? Apply Online for Caste Certificate

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.