वृत्त विशेषकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पोकरा अनुदान लाभार्थी यादी – PoCRA Beneficiary List

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील पोकरा अनुदान लाभार्थी यादी आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे.

“ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेमुळे पोक्रा अंतर्गत प्रत्येक गावाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. यामुळे या प्रकल्पाअंतर्गत योजनांना अधिक चालना व हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन मिळेल.”

पोक्रा अंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती या ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेत देण्यात आली आहे. महापोक्रा संकेतस्थळावर खास एक विभाग विकसित करण्यात आला आहे. जिल्हा, तालुका व त्यातील गाव निवडून गावाची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

हवामानात होणारे बदल शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेकदा आपल्या भागातील शेती योजनांची माहिती शेतकऱ्यांना एका ठिकाणी उपलब्ध नव्हती, ती आता सहज उपलब्ध होत आहे.

>

PoCRA अंतर्गत १५ जिल्ह्यांतील प्रत्येक प्रकल्प गावातील पोक्राचे समूह सहायक, कृषीसहायक, शेतीशाळा प्रशिक्षक, संबंधित तालुका व उपविभागीय कृषी अधिकारी असे प्रकल्प कर्मचारी व अधिकारी, तसेच सरपंच व ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी यांची संपर्क सूची देण्यात आली आहे.

यामुळे सर्वसामान्य शेतकरी संबंधितांशी थेट संपर्क साधू शकतात. तसेच, गावातील शेतकऱ्यांनी घेतलेला वैयक्तिक लाभ व घटकनिहाय अनुदान वितरण, एकूण नोंदणी व अर्ज संख्या कळेल. ग्राम कृषी संजीवनी समितीच्या पुढाकाराने गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे, गावातील पाण्याचा ताळेबंद, पिकाखालील एकूण क्षेत्र याचा तपशील असा एकूण गावाचा लेखाजोखा येथे मांडण्यात आला आहे. गावाचा नकाशा देखील यामध्ये पहायला मिळेल. यामुळे अत्यंत पारदर्शकपणे सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पोकरा अनुदान लाभार्थी यादी – PoCRA Beneficiary List:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पोकरा अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील PoCRA लिंकवर क्लिक करा.

https://mahapocra.gov.in/village-profile

PoCRA पोर्टल ओपन केल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडून Download Beneficiary List वर क्लिक करा.

Download Beneficiary List
Download Beneficiary List

Download Beneficiary List क्लिक केल्यानंतर गाव लाभाथी यादी PDF फाईल मध्ये डाउनलोड होईल.

गाव लाभाथी यादी
गाव लाभाथी यादी

गाव लाभाथी यादी मध्ये आपण क्रियाकलाप गट, लाभार्थीचे नाव, वितरणाची तारीख आणि वितरित केलेली रक्कम पाहायला मिळेल.

हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.