जिल्हा परिषदतलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

7/12 व मिळकत पत्रिकावर ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) पहा !

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड-४) भाग दोन महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्राम पातळीवर महसूली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवहया विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं ७ हा “अधिकार अभिलेख विषयक असून गाव नमुना नं. १२ हा “पिकांची नोंदवही ठेवण्यासंदर्भात आहे. उक्त नमूद नियमपुस्तिकेतील गा.न.नं. ७-१२ संबंधी खुलासा अधिकार अभिलेख आणि पिकाची नोंदवही या शीर्षाखाली प्रकरणामध्ये या एकत्रित नमुन्यावरील सर्वसाधारण सूचना तसेच पीक नोंदवहीमधील नोंदी घेण्यासंदर्भातील कार्यपध्दती नमूद केलेली आहे.

सदयस्थितीत राज्यातील सर्व ७/१२ व मिळकत पत्रिका यांना ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) देण्याच्या अनुषंगाने, राज्यातील सर्व ७/१२ व मिळकत पत्रिका यांना ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यासाठी सर्व क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना सूचना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

7/12 व मिळकत पत्रिकावर ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक):

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतूदींन्वये प्राप्त अधिकारानुसार, संगणकीय प्रणालीद्वारा ७/१२मिळकत पत्रिका यांना देण्यात येणारा ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार:-

अ) ७/१२:

१) “गट क्रमांक व उपविभाग” या दर्शकाच्यापुर्वी त्याच ओळी मध्ये सुरूवातीला “ULPIN”:” असा ULPIN क्रमांक दर्शविण्यात यावा.

२) “ULPIN” शी संबंधित Scan करावयाचा “QR Code” गाव नमुना नं.७ वर उजवीकडील कोपन्यात दर्शविण्यात यावा व त्याखाली छोटया अक्षरात ULPIN क्रमांक दर्शविण्यात यावा.

ब) मिळकत पत्रिका:

१) मिळकत पत्रिकेच्या दर्शनी भागातील शीर्ष ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे बोध चिन्ह लावण्यात यावे.

२) ULPIN वा ULPIN क्रमांक हा मिळकत पत्रिकेच्या प्रथम ओळीच्या वर डावीकडे दर्शविण्यात यावा.

३) ULPIN या OR Code (ULPIN) मिळकत पत्रिकेच्या दर्शनी भागावर उजव्या कोपन्यावर नमूद करण्यात यावा आणि त्या खाली ULPIN क्रमांक दर्शविण्यात यावा.

यानुसार उपरोक्त प्रमाणे ULPIN क्रमांक, त्याचा QR Code तसेच मिळकत पत्रिकेवर शीर्षस्थानी महसूल विभागाचे बोधचिन्ह केल्यानंतर दिसणाऱ्या ७/१२ आणि मिळकत पत्रिका (नमुना प्रती) यांच्या प्रतीचा नमुना अनुक्रमे खालील शासन निर्णयामध्ये परिशिष्ट “अ” व “ब” मध्ये जोडला आहे.

महसूल व वन विभाग शासन निर्णय:

7/12 व मिळकत पत्रिका यांच्या दर्शनी भागावर ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) दर्शविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सातबारा ऑनलाईन पहा : सातबारा ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा (7/12) ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.