जिल्हा परिषदनोकरी भरतीमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेष

अंगणवाडी सेविका मदतनीस भरती (सांगली) – Anganwadi Bharti 2024

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : एबावि-2022/ प्र.क्र.94/का.6 दिनांक 02 फेब्रुवारी, 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्रपूरस्कृत योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका मदतनीस भरती (सांगली) – Anganwadi Bharti 2024:

अंगणवाडी सेविका, मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती (By Nomination) संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस (मानधनी सेवा)

शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष आवश्यक राहील, शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सोबत जोडाव्यात.

मानधन : अंगणवाडी मदतनीस एकत्रित रू. 5500/- मिनी सेविका 7200/- दर महा

वास्तव्याची अट : उमेदवार सांगली जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्राअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यक्षेत्रातील रहीवासी असावा कार्यक्षेत्राची यादी सोबत जोडली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी असल्याबाबतचा इतर पुरावा उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड किंवा रेशनकार्ड सत्यप्रत जोडावी. ज्या उमेदवारांचा विवाह झालेला आहे त्यांनी त्यांचे पतीकडील रहिवासी पुरावा जोडावा. माहेरचा पुरावा ग्राढ्य धरण्यात येणार नाही.

वयाची अट : जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे राहिल.

लहान कुटूंब : वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील. उमेदवारास दोनपेक्षा जास्त अपत्ये नसावीत. अर्जासोबत परिशिष्ट ब मधील नमुन्यात लहान कुटूंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील.

भाषेचे ज्ञान : इयत्ता 10 वी किवा 10 वी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा सह उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.

विधवा अनाथ उमेदवारा बाबत : विधवा अनाथ उमेदवार असल्यास उमेदवाराने सक्षम प्राधिकारी साक्षांकीत प्रमाणपत्रची प्रत सोबत जोडावी.

बदली : अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. तसेच प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

मागासवर्ग प्रवर्ग : अनुसूचित जाती/जमाती/इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग या उमेदवाराने सक्षम प्राधिकारी साक्षांकीत प्रमाणपत्रची प्रत सोबत जोडावी.

अनुभव : शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव असल्यास सक्षम प्राधिका-यांच्या साक्षांकीत प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी.

जाहिरात प्रसिध्दी दिनांक : दि :- 22/12/2023

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : अर्ज स्विकारण्याचा अंतिम वेळ व दिनांक 08/01/2024 सायंकाळी 06:15 वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) जिल्हा सांगली, पुष्पराज चौक सांगली मिरज रोड जिल्हा परिषद दुसरा मजला सांगली, या पत्यावर अर्ज सादर करण्यात यावेत.

प्राथमिक यादी : अर्ज स्विकारण्याच्या दिनांकापासून 10 दिवस (कार्यालयात नोटीस बोर्ड वर प्रसिदध करण्यात येईल)

प्रतिक्षा यादी :

जर उमेदवार हा नियुक्ती दिनांकाच्या आदेशापासून 30 दिवसामध्ये रूजू झाला नाही किंवा अपात्र ठरविण्यात आले तर प्रतिक्षा यादीतील गुणानुक्रमांकानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहिर झाल्या पासून एक वर्षापर्यंत वैध राहिल.

निवड प्रक्रिया विरूध तक्रार/आपील : 

१. प्राथमिक गुणानुक्रम यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तीक माहिती खोटी असल्याची तक्रार किंवा इतर बाबीबाबत तक्रार असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.

२. निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मा. विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास पुणे विभाग पुणे यांच्याकडे अपील दाखल करता येईल

कागदपत्रांच्या प्रति : अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीवर सक्षम प्राधिका-याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.

अर्ज : जहिराती मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यात अर्ज करावा ( कार्यालयाकडून अर्जाचा कोरा नमुना अर्ज पुरवण्यात येणार नाही.)

निवड प्रक्रिया : शासन निर्णयात नमुद केल्या प्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे करण्यात येईल.

पत्र व्यवहार : भरती प्रक्रिये संबंधी अर्जदारास कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही, सर्व सूचना जहिराती मधील अटी व शर्ती प्रमाणे असून वेळोवेळी सूचना कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.

अर्ज : अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किमान शेक्षणिक पात्रता एकच (इयत्ता 12 वी उत्तीर्ण) असल्यामुळे उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे. त्याला अधोरेखीत (मार्क) करावे.

अंगणवाडी निवड : बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सांगली या कार्यालयाच्या नागरी क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना स्थानिक रहिवासी समजले असल्यामुळे अंगणवाडी, मदतनिस यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहिर झाल्यानंतर गुणानुक्रमे अंगणवाडी, मदतनिस यांची निवड केले जाईल व गुणानुक्रमानुसार अंगणवाडी देण्यात येईल त्यामुळे कार्यक्षेत्रातील कोणत्याही निवड झालेल्या अंगणवाडीवर काम करावे लागेल, व त्यांना प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

सेवासमाप्ती साठी वयाची अट : सदर आदेशान्वये नियुक्त होणा-या अंगणवाडी मदतनिस यांची सेवा वयाची 60 वर्ष होईपर्यत किंवा त्या शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तो पर्यंत सुरु राहिल.

अर्ज :

  • अंतीम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोस्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अंतीम निवड झालेल्या उमेदवारांना निकाला बाबत कळविण्यात येईल इतर उमेदवारांना कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • एखादया उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यास निवड प्रकियेतुन बाद करण्यात येईल.
  • अंगणवाडी मदतनीस यांना शासन दरानुसार दरमहा मानधन देय आहे. शासकीय नियमानुसार एकत्रीत मानधनात वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञेय राहील मात्र मानधना व्यतीरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते, सवलती अनुज्ञेय नाही.
  • अंगणवाडी मदतनीस हे एकत्रीत मानधनावरील मानधनी स्वरुपाचे पद आहे. सदर पदास बढती, बदली, सेवानिवृत्ती वेतनवाढ इ. शासकीय सवलतीस पात्र नाही.
  • अर्जदाराने संपूर्ण अर्ज भरावा.

बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली या मदतनीस / मिनी सेविका रिक्त पदांची माहिती.

अ.क्र. अंगणवाडी क्रमांक अंगणवाडीचे पत्ते
1 164 शिवानुभव मंडप, जत
2 167 रामरावनगर, जत
3 174 कड़ी मळा, जत
4 175 हनुमान मंदिर जत
5 179 सुनेत्रा कॉलनी, जत
6 182 लक्ष्मी बाग, जत
7 23 डोंगरे गल्ली, खानापूर
8 24 नवीन वसाहत, खानापूर
9 147 जांभळ मळा, खानापूर
10 73 समाज मंदिर, कवठेमहांकाळ
11 74 म्हसोबा देवालय, कवठेमहांकाळ
12 78 अंबिका देवालय, कवठेमहांकाळ
13 79 बंडगर वस्ती, कवठेमहांकाळ
14 81 नरगोल वस्ती, कवठेमहांकाळ
15 84 विद्यानगर, कवठेमहांकाळ
16 89 माळेवाडी, कवठेमहांकाळ
17 91 माळी तेली वस्ती, कवठेमहांकाळ
18 49 भारतीनगर, पलूस
19 52 शिवाजीनगर, पलूस
20 54 पदमानगर, पलूस
21 57 गोंदीलवाडी, पलूस
22 171 इंदीरानगर झोपडपटटी, तासगाव
23 175 पेटकर प्लॉट, तासगाव
24 20 तहसिलदार परिसर, कडेगाव मिनी सेविका
25 24 माळीनगर-01. कडेगाव मिनी सेविका
26 84 नगरपंचायत पाठीमागे, कडेगाव
27 86 शिवाजी चौक, कडेगाव
28 87 महादेव मंदीर, कडेगाव
29 91 तडसर रोड, कडेगाव
30 207 प्राध्यापक कॉलनी, शिराळा

एकूण 28 मदतनीस / 2 मिनी सेविका रिक्त पदाची संख्या व ठिकाणे या मध्ये बदल/कमी अधिक होवू शकतो.

हेही वाचा – अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.