भारत सरकारचे दामिनी अॅप वीज पडण्यापूर्वी नागरिकांना करणार सावधान ! – Damini Lightning Alert App
मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी” अँप तयार केले असुन सदरचे ॲप गूगल प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे. करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी/कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय तलाठी, अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे अॅप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापुर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
आपले अॅप मध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे अॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे याबाबतचा सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन दामीनी अॅप प्लेस्टोअर डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहीती दयावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, अशा सूचना पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारने दिल्या आहेत.
गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सदर अॅप डाउनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या Alert नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे, अशा सूचना पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारने दिल्या आहेत.
दामिनी अॅप काय आणि कसे काम करते?
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेनं 2020 मध्ये ‘दामिनी लाईटनिंग’ ॲप विकसित केलं आहे. संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो , त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो. हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देतं. तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असात तर काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना या अॅपमध्ये दिल्या आहेत. आता हे ॲप कसं वापरायचं ते जाणून घेऊया.
गडगडाटी वादळ झाल्यास काय करावे हे देखील अॅप सांगते.
या अॅपमध्ये बरीच माहितीपूर्ण माहिती खाली दिली आहे. वीज पडल्यास कसे वाचवायचे हे सांगितले आहे. सुरक्षिततेच्या उपायांसोबतच प्रथमोपचाराची माहितीही दिली जाते. वीज पडण्याची घटना मानव आणि गुरांसाठी जीवघेणी आहे. हे थांबवता येत नाही, पण टाळता येते.
विजांच्या स्थितीबाबत जागरुकता असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा अंदाज दामिनी अॅपच्या माध्यमातून वर्तवण्यात आला असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजेच वेळीच सावध राहून जीवित व वित्तहानी टाळता येते.
चेतावणी (Alert) मिळाल्यावर काय करावे?
तुमच्या परिसरात वीज कोसळल्यास दामिनी अॅप तुम्हाला आगाऊ चेतावणी देईल. अशा परिस्थितीत वीज पडू नये म्हणून मोकळ्या मैदानात, झाडांखाली, डोंगराळ भागात, खडकांवर थांबू नका. धातूची भांडी धुणे टाळा आणि आंघोळ टाळा. पाऊस टाळा आणि जमिनीवर जिथे पाणी साचते तिथे उभे राहू नका. छत्री कधीही वापरू नका. इलेक्ट्रिकल हाय-टेन्शन वायर आणि टॉवर्सपासून दूर राहा. घराच्या आत जा. जर तुम्ही बाहेर कुठे असाल आणि घरी जाणे शक्य नसेल तर कान बंद करून मोकळ्या जागी गुडघ्यावर बसा. धोका संपल्यावर घरी जा.
दामिनी अॅप डाउनलोड (Damini Lightning Alert App): दामिनी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारचे अधिकृत संकेतस्थळ: https://www.moes.gov.in
संपर्क क्रमांक: 1800220161
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!