महाराष्ट्र कृषि पणन मंडळाच्या नवीन एमएसएएमबी अॅप वर आता शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती – MSAMB App
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे पणन संचालक तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सुनिल पवार, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे, नाबार्ड व डी. एम. आयचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती उपलब्ध असलेल्या या मोबाईल अॅपचा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.
सध्या मोबईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून आवश्यक माहिती एसएमएस अथवा अॅपद्वारे सहज उपलब्ध होत आहे. शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत. कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रम तसेच बाजारभाव याबाबत माहिती शेतकरी, बाजार समित्या, बाजार घटक व सर्वसामान्यांना सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी कृषि पणन मंडळाने मोबाईल अॅप अद्ययावत केले आहे.
या अॅपद्वारे कृषि पणन मंडळाच्या माहिती व्यतिरीक्त राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती, कृषि पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था आदी माहिती उपलब्ध आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत माहिती कृषि पणन मंडळाच्या अॅपद्वारे सहजरित्या भरता येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभावाची माहिती एकत्रित करणे सोईचे होणार आहे. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार व त्याचा शेतमाल याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एमएसएएमबी अॅपची (MSAMB App) वैशिष्ट्ये:
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे मोबाईल एमएसएएमबी अॅपची (MSAMB App) वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
- राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMC) बद्दल.
- महाराष्ट्रातील APMC चे प्रोफाइल.
- शेतमालाची रोजची आवक आणि किमती. राज्यातील एपीएमसीमध्ये वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते.
- राज्यातील सर्व APMC साठी युनिक युजरनेम आणि पासवर्डसह लॉगिन सुविधा.
- दैनंदिन आवक आणि शेतमालाच्या किमतींसाठी डेटा एंट्रीची यंत्रणा. एपीएमसीमधील वस्तू.
- एपीएमसी, वस्तूनिहाय अहवाल आणि एपीएमसीचा दैनिक डेटा एंट्री स्थिती अहवाल पाहण्याची सुविधा.
- MSAMB चे मासिक कृषी पणन मित्र (KPM) मासिक.
- शेतमाल विक्रीसाठी तारण कर्ज योजना.
- MSAMB द्वारे आयोजित फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम.
- संरक्षित लागवड पद्धतींसाठी फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र.
- अॅग्रीचे खरेदीदार आणि विक्रेते यांना जोडण्यासाठी प्लॅटफॉर्म. वस्तू.
- MSAMB चा प्रकल्प सल्लागार विभाग.
- निर्यात प्रोत्साहनाशी संबंधित उपक्रम.
- MSAMB निर्यात क्रियाकलाप.
- MSAMB क्रियाकलापांशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ).
- वापरकर्त्यांचा अभिप्राय.
- MSAMB संपर्क निर्मितीमध्ये.
एमएसएएमबी (MSAMB) अॅप डाउनलोड:
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवर एमएसएएमबी (MSAMB) या नावाने मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.
एमएसएएमबी (MSAMB) अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- गुगल प्ले स्टोअर (Google Play Store): एमएसएएमबी (MSAMB) अॅप गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइड मोबाईलसाठी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
- अॅप स्टोअर (Apple App Store): एमएसएएमबी (MSAMB) अॅप स्टोअर Apple iOS मोबाईलसाठी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
MSAMB अॅपमुळे मोबाईलद्वारे शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्या,कृषि पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती,शेतमाल विक्रेता व खरेदीदार, कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रमाची माहिती सहजरित्या मिळेल अशी माहिती पणन संचालक श्री.पवार यांनी दिली.
हेही वाचा – सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!