नोकरी भरतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

Police Patil Recruitment | पोलीस पाटील भरती (भंडारा जिल्हा) | Police Patil Bharti 2023

भंडारा जिल्हयातील साकोली उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (साकोली, लाखनी व लाखांदूर तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑफलाईन पध्दतीने अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.

Police Patil Recruitment | पोलीस पाटील भरती (भंडारा जिल्हा) | Police Patil Bharti 2023

अ.क्र. करावयाची कार्यवाही दिनांक
1 अर्ज वाटप व स्विकारण्याची अंतीम मुदत व स्थळ 27/03/2023 ते 06/04/2023 (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत. स्थळ:-
1) उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, साकोली
2) तहसिल कार्यालय, साकोली
3) तहसिल कार्यालय, लाखनी
4) तहसिल कार्यालय, लाखांदूर
2 परिक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत राष्ट्रीयकृत बँकेचे (D.D. व्दारे) ०६/०४/२०२३ (सांय 5.00 वा. पर्यंत )
3 प्राप्त अर्जाची छाननी ०७/०४/२०२३ ते ११/०४/२०२३
4 अंतिम यादी व प्रवेशपत्र प्रसिध्द करणे 11/04/2023 (छाननीनंतर)
5 लेखी परिक्षेचा दिनांक २३-०४-२०२३
6 परिक्षेचा निकाल जाहिर करणे २४-०४-२०२३
7 मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे २४-०४-२०२३
8 पात्र उमेदवारांचे तोंडी मुलाखतीचा दिनांक साकोली तालुका २६/०४/२०२३
लाखनी तालुका- 27/04/2023
लाखांदूर तालुका २८/०४/२०२३
9 अंतिम निकाल जाहिर करणे २८-०४-२०२३

परिक्षा शुल्क खालील प्रमाणे विहित पध्दतीने भरावे लागेल. ( राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे (D.D.)

  • खुला प्रवर्ग – रुपये 500/-
  • आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी रुपये – 300/-

सरळसेवा भरती प्रक्रीयेची सविस्तर जाहीरात भंडारा जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अर्जदाराने संपूर्ण प्रक्रीया काळजीपूर्वक समजून ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदाचे परिक्षेचे अर्ज फक्त उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय साकोली, तहसिल कार्यालय, साकोली, लाखनी, लाखांदूर येथे ऑफलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त स्थळावरच ऑफलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहीत परिक्षा शुल्क असलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे परिक्षा शुल्क स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्यावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.

भरती प्रक्रिया परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशत: बदल करणे पदाच्या एकूण व आरक्षण प्रवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांनी राखून ठेवले असून त्याचा निर्णय अंतिम असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. साकोली उपविभागातील पोलीस पाटीलाची मंजुर पदे रिक्त पदे, तसेच 30% महिलांसाठी आरक्षित ठेवलेली पद विचारात घेवून सद्यस्थितीत जी पद भरणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता :-

1) अर्जदार हा दहावी (एस. एस. सी.) उत्तीर्ण असावा.

2) (अ) वयोमर्यादेकरीता अर्जदाराचे दिनांक 06/04/2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल.

(ब) अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.

(क) पोलीस पाटील पदांकरीता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.

3) अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा. त्याकरिता संबंधित ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

4) अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचे ई-मेल व WhatsApp नंबर नमूद करणे अनिवार्य आहे.

5) अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.

6) महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)

7) मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.

8) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज व, क, ड या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2022-23 या कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.

9) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज ब, क, ड या प्रवर्गातील महिला पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 2022 – 23 या कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.

परिक्षेचे स्वरुप:-

अ.क्र. पदनाम संवर्ग परिक्षेचे गुण
1 पोलीस पाटील लेखी परिक्षा तोंडी परिक्षा (मुलाखत) एकुण गुण
80 20 100

लेखी परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप साधारणपणे खालील प्रमाणे राहील:-

1. पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.

2. लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.

3. लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती व चालु घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल.

4. लेखी परिक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमाण 36 गुण (45% ) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा घेण्यात येईल.

5. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम /2010/2009/प्र. क्र. 66/10/13-अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेखी परिक्षा घेतेवेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहीण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल.

निवड कार्यपद्धती, अटी व शर्ती :-

1) प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारांस शैक्षणिक पात्रता व इतर संबंधीत मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून दयावी लागतील. अन्यथा तोंडी परिक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.

2) लेखी परिक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मुळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरीम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या अर्जदाराची जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती, परिक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच अर्जदाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्पयाकरीता करण्यात येईल. जाहिरातीत नमुद केलेली संपूर्ण अर्हता अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होवू शकेल. तसेच अशा अर्जदाराचे परिक्षा शुल्क इत्यादीसारख्या सवलती नामंजुर करण्यात येतील. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

3) अर्जदार शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. व अर्जदाराची पात्रता वैद्यकिय तपासणी अंतीच निश्चित करण्यात येईल.

4) अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधीत पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

5) अर्जदारांचे कोणत्याही राजकिय पक्षाशी संबंध नसावा. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नसावा. तसेच खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा, अथवा पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा याबाबतचे रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

6) पोलीस पाटील पदावरील नियुक्तीकरीता मृत / सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल. परंतु याचा अर्थ एकाच स्थानासाठी (Position) पोलीस पाटलांच्या वारसांसह दोन किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलांच्या वारसांची निवड करण्यात प्राधान्य देण्यात येईल. परंतु तो महाराष्ट्र ग्रामपोलीस पाटील ( सेवा प्रवेश, पगार भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती) आदेश 1968 व त्यामध्ये वेळावेळी करण्यात आलेल्या सुधारणानुसार त्या गावांसाठी ठरविण्यात आलेल्या सामाजिक / समांतर आरक्षणाचा असला पाहिजे.

7) अर्जदार संबंधीत गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

8) अर्जदार कोणत्याही एकाच गावाचा स्थानिक / कायमचा रहिवासी असू शकतो. सबब अर्जदाराने अशाच एका गावात अर्ज करावा. एकापेक्षा अधिक गावातून केलेले सर्व अर्ज बाद करण्यात येतील.

9) प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकिय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे. अर्ज करतांना अर्जदाराने आरक्षण तपासून अर्ज करावा. (आरक्षण व्यतिरीक्त असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये.)

10) साकोली उपविभागातील रिक्त पदांच्या सर्व गावांसाठी एकाच दिवशी व वेळी परिक्षा घेण्यात येईल.

11) संपूर्ण भरती प्रक्रीया गाव निहाय होणार असून कोणत्याही दोन गावाच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल.

12) पोलीस पाटील हे पद वर्गीकृत नाही.

13) पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर (Field work) काम करावे लागते. त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना अपंगासाठीचे आरक्षण लागू करण्यात आलेले नाही.

14) पोलीस पाटील हे पद एका गावात एकच असते त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू यासारखी समांतर आरक्षणे लागू होत नाहीत.

15) महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचेसाठी आरक्षण अधिनियम 2001 (सन 2004 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 08) हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक 29/01/2004 पासून अंमलात आणला आहे. त्यानुसार उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमीलेअर) तत्वत: अनुसूचित जाती, खुला प्रवर्ग यांना लागू आहे. सदर प्रवर्गातील अर्जदारांकडे दि. 31/03/2023 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमीलेअरचे तत्वत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला प्रवर्ग यांना लागू राहतील. तसेच त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.

16) शासन, महिला व बालविकास विभागाकडील निर्णय क्र. 82/2001/मसे आ/2000/प्र.क्र. 412/का-2 दिनांक 25/05/2001 आणि तद्नंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज- व, क, ड प्रवर्गातील महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला अर्जदारांनी सन 2022-23 या कालावधी करीता दिनांक 31/03/2023 पर्यन्त वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

17) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन अधिसूचना क्र. एसआरव्ही-2000/प्र.क्र.17/ 2000/12, दिनांक 28/03/2005 व क्र.एसआरव्ही- 2000/प्र.क्र.17/2000 दिनांक 01/07/2005 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम 2005 अन्वये दिनांक 28/03/2005 रोजी हयात असलेले व त्यानंतर जन्माला आलेल्या अपत्यांच्या संख्येबाबत लहान कुटुंब असल्याचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच अविवाहीत असणाऱ्या उमेदवारांनेही विहीत (अ) नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

18) लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या अर्जदारास पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी (मुलाखत) परिक्षेस अनुपस्थित राहणारा अर्जदार अंतीम निवडीस अपात्र ठरेल. उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे तो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर असा अर्जदार पोलीस पाटील पदावरील निवडीकरीता पात्र राहील.

19) समान गुण मिळाल्यास अंतिम निवड शासन निर्णय क्र. डीव्हीपी 1113/1767/प्र.क्र.592/ पोल 8 दिनांक 22/08/2014 अन्वये गुणवत्ता यादीतील एकाच स्थानासाठी (Position) दोन किंवा अधिक अर्जदाराला समान गुण मिळाल्यास प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतीम निवड केली जाईल.

1) पोलीस पाटलांचे वारस, त्यानंतर
2) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्जदार, त्यानंतर
3) माजी सैनिक असलेले अर्जदार, त्यानंतर
4) वयाने जेष्ठ असलेले अर्जदार

पोलीस पाटलांच्या वारसामध्ये पती, पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश, त्या व्यतिरीक्त अन्य कोणत्याही नातेवाईकांचा वारस म्हणून विचार करता येणार नाही.

20) याशिवाय महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 व त्यास संलग्न असलेले नियम आणि वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले आदेश शासन निर्णय, परिपत्रकातील नेमणुकीसाठी इतर प्रचलित असलेल्या अटी सुध्दा बंधनकारक असतील.

21) हा जाहीरनामा/ जाहिरात प्रसिध्द होण्यापुर्वी ज्या उमेदवारांनी पोलीस पाटील पदांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज केले असतील ते सर्व अर्ज रद्द झाले आहेत. असे समजण्यात येईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पोलीस पाटील विषयी सविस्तर माहिती; पात्रता, निवड प्रक्रिया, कर्तव्ये आणि अधिकार – Detailed information about Police Patil

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.