वृत्त विशेषसरकारी योजनास्कॉलरशिप - शिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा

Barti JEE NEET Exam Training : बार्टी मार्फत जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरु !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-१०० व NEET-१०० जागांकरिता प्रशिक्षण (Barti JEE NEET Exam Training) राबविण्यात येत आहे.

बार्टी मार्फत जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरु ! Barti JEE NEET Exam Training:

पात्रता:-

१. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.

३. उमेदवार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी (विज्ञान) चे शिक्षण घेत असावा.

४. रु. ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.

५. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.

६. उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.

आरक्षण :-

महिला ३०%, दिव्यांग (PWD) ५%, अनाथ-१%, वंचित-५% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ. साठी), जागा आरक्षित असतील.

विद्यार्थी निवडीचे निकष :-

प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल.

प्रशिक्षणाच्या अटी व शती :-

१. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३०/०६/२०२४

२. प्रशिक्षण कालावधी २४ महिन्यांचा राहील.

३. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा  रु.६०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल.

४. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.५०००/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.

५. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Barti JEE NEET Exam Training) :

इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – NSFDC Scheme : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.