आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

MahaJyoti Free TAB 2025-26 : महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब (MahaJyoti Free TAB) व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु ! MahaJyoti Free TAB 2025-26:

JEE/NEET/MHT-CET – Batch – 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.

3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागद‌पत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.

5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.

6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5. 10 वी ची गुणपत्रिका

6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)

7. दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला

अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याची अंतिम दि. 10/07/2024 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.

अर्ज कसा करावा.

1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for JEE/NEET/MHT-CET Batch -2026 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

ऑनलाईन अर्ज (MahaJyoti Free TAB Apply Online ) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क: अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा : संपर्क क्र. 0712-2870120/21 ईमेल आयडी : mahajyotimpsc21@gmail.com

हेही वाचा – NSFDC Scheme : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “MahaJyoti Free TAB 2025-26 : महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.