वृत्त विशेषनगरपंचायतनगरपरिषदसरकारी कामे

नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर ! Municipal Council or Nagar Panchayat property tax online

मालमत्तेचे मालक होण्यासाठी एकरकमी रक्कम भरावी लागते, परंतु या मालमत्तेवर त्यांची मालकी टिकवण्यासाठी त्यांना मालमत्ता कराच्या रूपात सातत्याने लहान रक्कम भरावी लागते. म्हणून, मालमत्ता कर हा मालमत्तेच्या मालकीवर लादलेला थेट कर आहे. मालमत्ता कर भरणे हे भारतातील विकास आणि नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. अचल मालमत्तेच्या मालकांना वार्षिक आधारावर कर भरणे अनिवार्य आहे.

मालमत्तेचा मालक स्थानिक संस्था (उदाहरणार्थ, नगरपालिका) द्वारे आकारण्यात येणारा कर भरण्यास जबाबदार असतो आणि अशा कराला मालमत्ता कर म्हणतात. हा कर एका ठिकाणानुसार बदलू शकतो आणि इतर अनेक घटक आहेत जे देय मालमत्ता कराची रक्कम ठरवतात. आपण या लेखात नगरपरिषद किंवा नगरपंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नगरपरिषद किंवा नगरपंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर ! Municipal Council or Nagar Panchayat property tax online:

नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी नवीन मालमत्ता नंबर माहित असेल तर खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन पेमेंट करा.

>

https://mahaulb.in/MahaULB/property/propertyOnlinePay

नवीन मालमत्ता क्रमांक जाणून घ्या:

नवीन मालमत्ता क्रमांक जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर जाऊन प्रश्नचिन्हावर क्लिक करा.

New Property Number
New Property Number

ULB Name मध्ये तुमच्या नगरपरिषद किंवा पंचायतचे नाव निवडा, मी इथे कुळगाव बदलापूर निवडतो.

ULB Name
ULB Name

ULB Name मध्ये नगरपरिषद किंवा पंचायतचे नाव निवडल्यानंतर जुना मालमत्ता क्रमांक (Old Property Numbe) टाकून Search वर क्लिक करा.

Old Property Numbe
Old Property Numbe

जुना मालमत्ता क्रमांक (Old Property Numbe) टाकून Search केल्यानंतर खाली नवीन मालमत्ता क्रमांक दिसेल त्यावर क्लिक करा किंवा Pay क्लिक करा.

Pay
Pay

Pay वर क्लिक केल्यानंतर मालमत्ता बिल भरणा पेज ओपन होईल त्यामध्ये फ्लॅट नंबर निवडा आणि सर्व माहिती तपासून घ्या आणि पुढे देय रक्कम, नाव, मोबाईल नंबर, आणि ई – मेल आयडी टाकून कॅप्चा कोड टाका आणि Pay वर क्लिक करा.

Property Bill Payment
Property Bill Payment

मालमत्ता बिल भरण्यासाठी आपण नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड वापरू शकता, मालमत्ता बिल भरल्यानंतर बिल भरल्याची पावती येईल ती डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.

हेही वाचा – मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.