जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार !
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी संदर्भ क्र. ५. दिनांक १५.०६.२०१८ च्या शासन आदेशात सुधारणा करणेबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी संदर्भ क्र. ६. दिनांक १०.१२.२०२१ च्या पत्रान्वये प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार याबाबत निर्गमित केलेल्या संदर्भ क्र. ५ च्या शासन आदेशातील अ. क्र. १ व २ मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ (१) नुसार शासनास असलेल्या अधिकारान्वये राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेसाठी निर्गमित खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ५ च्या शासन आदेशातील अ. क्र. १ व २ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
१. नोकरभरती प्रक्रिया फक्त ऑनलाईन पध्दतीने करणे.
आतापर्यंत प्राप्त विविध तक्रारींच्या चौकशीमध्ये सेवक भरतीसाठी अवलंबिलेल्या ऑफलाईन परीक्षा पध्दतीत परिक्षोत्तर कालावधीतील उत्तरपत्रिका, गुणतक्ता इ. मध्ये आढळून आलेला बाहेरील हस्तक्षेप लक्षात घेता ऑफलाईन परीक्षा पध्दत बंद करण्यात यावी. यापुढे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील विविध पदांसाठीच्या नोकरभरती प्रक्रियेसाठीची परीक्षा फक्त संगणकीय ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात यावी.
सदर ऑनलाईन नोकरभरती मधून चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी जसे सुरक्षारक्षक, वाहनचालक (शिपाई हे पद वगळून) त्याचप्रमाणे नाबार्डकडील राज्यस्तरीय कार्यबलाच्या अहवालातील प्रकरण ५ मध्ये नमूद वरीष्ठ व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापनामधील पदे तसेच विशेष/तांत्रिक पदे वगळण्यात येत आहेत. सदर अहवालामध्ये अ प्रवर्गातील बँकांसाठीची २५ पदे, व प्रवर्गातील बँकांसाठीची २१ पदे के प्रवर्गातील बँकांसाठीची १८ पदे व ड प्रवर्गातील बँकांसाठीची १५ पदे यांचा समावेश राहील.
२. जि.म.स. बँकांची सेवकभरती करणेसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करणे.
ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थांची/एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका/पॅनल सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी तयार करावे. यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई इंडियन बँक असोसिएशन (IBA), इंडियन बँकींग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) यासारख्या यंत्रणांचा समावेश असावा. भरती प्रक्रीया राबविण्यासाठी संबंधित बँकांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी तयार केलेल्या राज्यस्तरीय तालिका/पॅनल मधील संस्थांना निमंत्रण देऊन त्यांच्यापैकी एका संस्थेची नियुक्ती करावी. ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थांची/एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका/पॅनल मध्ये खालील प्रमाणे अहर्ता धारण करणाऱ्या संस्थेची नियुक्ती करावी:
i. नियुक्त करण्यात येणारी संस्था नोंदणीकृत असावी.
ii. सदर संस्थेस या अगोदर व्यापारी बँका (राष्ट्रीयकृत बँका/खाजगी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच शासनातील विविध विभागांसाठी किमान तीन वेळा ऑनलाईन नोकरभरतीची प्रक्रिया राबविलेली असावी. संस्थेची निवड करतांना गरजेनुसार परिक्षा राबविण्याची क्षमता व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या संस्थेचा प्राधान्याने विचार करावा.
iii. सदर संस्थेविरुध्द यापुर्वी कोणत्याही नोकरभरतीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींच्या चौकशीमध्ये सदरची संस्था परीक्षेसंबंधी गलथान व्यवस्थापन, भ्रष्टाचार, गुन्हेगारी पध्दतीचा हस्तक्षेप इ. बाबतीत दोषी असल्याचे सिध्द झालेले नसावे किंवा सदर संस्थेला (नोकरभरतीच्या अनुषंगाने) काळया यादीत (Black list) समावेश केलेले नसावे.
iv. नोकरभरती प्रक्रीया सक्षमपणे व कार्यक्षमपणे ऑनलाईन पध्दतीने राबविण्याची सुविधा निवड केलेल्या संस्थेकडे असणे आवश्यक आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये परिक्षार्थ्यांची संख्या विचारात घेता एकाच सत्रात परीक्षा घेणे शक्य नसल्यास, उमेदवारांच्या संख्येप्रमाणे पायाभूत सुविधांची उपलब्धता लक्षात घेऊन ऑनलाईन परीक्षा नजीकच्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात यावी. एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेतांना प्रश्नपत्रिकेची काठिण्य (difficulty level) पातळी सारखीच राहील, याची जबाबदारी ऑनलाईन परिक्षा राबविणाऱ्या संस्थेची राहील.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय:
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत शासन निर्णय जारी
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!