घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज !
ग्रामीण भागासह देशात छतावरच्या सौर (Rooftop Solar Yojana) प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी नविकरणीय उर्जा मंत्रालय छतावर सौर कार्यक्रमाचा II टप्पा राबवत आहे. या अंतर्गत निवासी भागात, अनुदानाच्या तरतुदीसह 4000 मेगावॅट स्थापनेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वैयक्तिक कुटुंबासाठी 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 40% अनुदान तर 3 च्या पुढे 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान पुरवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा मंत्री आर के सिंह यांनी काल राज्य सभेत लेखी उत्तरात दिली. गट गृहनिर्माण संस्था/निवासी कल्याण संघटना (जीएचएस/ आरडब्ल्यूए) साठी, सामायिक सुविधांसाठी उर्जा पुरवण्याकरिता 500 किलोवॅटपर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान आहे.
देशात ग्रीडशी संलग्न असलेल्या छतावरच्या सौर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या महत्वाच्या उपाययोजना याप्रमाणे आहेत-
- छतावरच्या सौर कार्यक्रमाचा II टप्पा सुरु करण्यात आला असून या अंतर्गत निवासी क्षेत्रासाठी केंद्रीय वित्तीय सहाय्य आणि उर्जा
- वितरण कंपन्या, डीसकॉमसाठी गेल्या वर्षीच्या स्थापित क्षमतेच्या तुलनेत अतिरिक्त क्षमता साध्य केल्यास प्रोत्साहन
- याआधी I टप्यामध्ये निवासी/संस्थात्मक/सामाजिक क्षेत्रासाठी केंद्रीय वित्तीय सहाय्य आणि सरकारी क्षेत्रासाठी कामगिरी संलग्न प्रोत्साहन पुरवण्यात येत होते.
- ऑनलाईन पोर्टल एकीकृत करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी तसेच छतावरच्या सौर प्रकल्पांसाठी राज्यांना सहाय्य
- प्राधान्य क्षेत्र कर्ज यामध्ये नविकरणीय उर्जेचा समावेश
- छतावरच्या सौर प्रकल्पांसाठी कल्पक व्यापारी मॉडेल राज्यांसमवेत सामायिक
- मुद्रित आणि इलेक्ट्रोनिक माध्यमांद्वारे माहिती प्रसारण आणि जनजागृती
रूफटॉप सोलर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Rooftop Solar Yojana:
रुफटॉप सोलर अनुदान योजनेचा (Rooftop Solar Yojana) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या पोर्टलला भेट द्या.
आता पोर्टल ओपन झाल्यानंतर “Apply for Solar Rooftop” या पर्यायावर क्लिक करा.
डिस्कॉम पोर्टल लिंक्स (DISCOM Portal Links):
आता तुम्ही इथे विविध डिस्कॉम पोर्टल लिंक्स पाहू शकता, त्यामध्ये आपले महाराष्ट्र राज्य शोधून तिथे तुम्हाला ४ कंपन्यांच्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पाहायला मिळतील.
इथे मी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड -ची खालील लिंक वर अर्ज करणार आहे, कारण मी त्या कंपनीचा अगोदरपासून ग्राहक आहे.
Application for installation of Renewable Energy Generating System:
आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड पोर्टल लिंक वरून नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती प्रणाली स्थापनेसाठी अर्ज ओपन होईल त्यामध्ये अर्ज भरण्यासाठी खालील सूचना वाचा आणि नंतर अर्ज करा.
1) ओटीपीसाठी योग्य ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर अनिवार्य आहे.
2) कृपया संबंधित स्तंभात पूर्ण आणि योग्य माहिती भरा.
3) अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार असेल.
4) अर्जदारास विनंती आहे की भविष्यातील अर्जाचा मागोवा घेण्यासाठी विनंती आयडी नोट करा.
5) अर्ज प्रक्रिया शुल्क (परत न करता येणारे)
अ) कमी तणावग्रस्त ग्राहक रू. 20 किलोवॅट पर्यंत मंजूर भार किंवा कराराची मागणी असलेल्या ग्राहकांसाठी 500 आणि त्यानंतर प्रत्येक 20 किलोवॅट किंवा त्या भागासाठी 100 रुपये.
ब) उच्च ताण ग्राहक 5000 / –
General Details:
यामध्ये अर्जदाराचा सर्व तपशील भरायचा आहे.
Technical Details :
यामध्ये सोलर पॅनल यंत्रा बाबत तांत्रिक तपशील भरा.
पुढे आपल्याला अर्जाचा तपशील दिसेल, तसेच नियम आणि अटी वाचून सत्यापनासाठी मोबाइलवर ओटीपी मिळविण्यासाठी कृपया जनरेट ओटीपी बटणावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.
नियम आणि अटी:
- नोंदणी फी भरल्यानंतर अर्जावर प्रक्रिया केली जाईल.
- आरई क्षमतेच्या मंजुरीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत आरई प्रकल्प सुरू करणे अनिवार्य आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर पेमेंट करा, एजन्सी निवडा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
हेही वाचा – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – Kusum Solar Pump Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!