वृत्त विशेषसरकारी योजना

मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध; अर्ज करण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकिर्ण प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

मुंबई शहर जिल्ह्याकरिता बाल न्याय निधी आयुक्त, महिला व बाल विकास पुणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हाकृती दल, मुंबई शहर यांच्या खात्यात हा निधी जमा केलेला आहे.

या रकमेचा विनियोग कोविड 19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी (शालेय शुल्क, वसतीगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी) प्रति बालक कमाल मर्यादा रु.10000/ (अक्षरी रु. दहा हजार) इतकी वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील कोविड 19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधी वितरित करावयाचा असल्याने पात्र लाभार्थी यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, बी.डी.डी. चाळ क्र.117, पहिला मजला, वरळी- 400018 यांचे कडून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रे मुळ अर्जासह प्रस्ताव जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर कार्यालयास सादर करावा.

प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर ते जिल्हा कृती दल यांना सादर करण्यात येईल. आर्थिक सहाय्य मंजुरीबाबतचा जिल्हा कृतीदल यांचा निर्णय अंतिम असेल त्याप्रमाणे निधी वितरण करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, दूरध्वनी क्रमांक २४९२२४८४ यांच्याकडे संपर्क साधावा.

अर्जाचा नमुना: अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज करा – MahaCovid19Relief

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.