ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज
ग्रामपंचायती मध्ये प्रत्येक रुपया कोठून व कसा आला ? प्रत्येक रुपया कोठे व कसा खर्च झाला? हे जाणून घेण्याचा प्रत्येक मतदारांला हक्क आहे. ग्रामपंचायतीने दरवर्षी लेखा परीक्षण अहवाल ग्रामसभेत मांडणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीने दरवर्षी लेखा परीक्षण अहवालाची प्रत प्रत्येक कर भरणाऱ्या खातेदारांना दिली पाहिजे. ग्रामपंचायतीने दरवर्षी विहित वेळेत लेखापरिक्षण करुन घेणे ही सरपंच व ग्रामसवेकांची जबाबदारी असते. लेखा परिक्षकांनी ऑडिटमध्ये काढलेल्या त्रूटी समजून घ्या. तसेच त्या त्रूटीची ग्रामपंचायत पूर्तता करते की नाही यावर लक्ष ठेवा.
ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी माहिती अधिकार अर्ज:
ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी खालील प्रमाणे आवश्यक मुद्दे माहिती अधिकार अर्जामध्ये लिहू शकता.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ – कलम ३ अन्व्ये अर्ज
(जोडपत्र “अ” नियम ३ नुसार)
प्रति, जनमाहिती अधिकारी,
ग्रामसेवक.…….. ग्रामपंचायत कार्यालय,
ता. ……… जि. ………….
अर्जदाराचे नाव व पत्ता:
माहितीचा विषय : ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) मिळणेबाबत.
अ) ग्रामपंचायतीने सन….ते ….. दरम्यान ) कोणकोणती विकास कामे केली? विकास कामाची यादी द्यावी. या विकास कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला. सदर निधी कधी व कसा खर्च करण्यात आला.
ब) आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्टची छांयाकित प्रत द्यावी.
क) ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत. त्यांना किती रूपये मासिक वेतन दिले जाते याचा तपशील द्यावा.
ड) ग्रामपंचायतीला सन…..ते ….. या तीन वर्षात प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून किती रूपये थेट अनुदान किंवा मदत रक्कम मिळाली या रक्कमेचा विनीयोग कोठे केव्हा व कसा झाला.
इ) सन…..पासून…..आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतीच्या एकूण किती ग्रामसभा भरवल्या गेल्या. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरूष व महिला सदस्यांची नावे व पत्ते मिळावेत. ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची छायांकित प्रती मिळाव्यात.
माहिती व्यक्तीश / स्पीड पोष्टाने हवी :
अर्जदार दारिद्र्य रेषेखालील (आहे/नाही, असल्यास पुराव्याची छायांकित प्रत जोडावी)
दिनांक : अर्जदाराची सही
स्थळ : मोबाईल नंबर :
माहिती अधिकार (RTI) नमुना अर्ज PDF फाईल : माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – माहिती अधिकाराचा अर्ज (RTI) ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!