आता शेतकऱ्यांचे जमिनीसंदर्भातील वाद मिटणार; प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला स्वतंत्र नकाशा!
राज्यात सातबारा उताऱ्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्यामुळे जमीन हद्दीचे वाद नेहमीच उद्भवत असतात. या समस्येमुळे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, भावकीतील तंटेही वाढले आहेत. मात्र, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूमि अभिलेख विभागामार्फत प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला (Separate Land MAP for each Survey Number) नकाशाची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला स्वतंत्र नकाशा! Separate Land MAP for each Survey Number:
प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला (Separate Land MAP for each Survey Number) नकाशाची जोड देण्याऱ्या या उपक्रमामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची नेमकी हद्द कोणती आहे हे स्पष्ट होईल. परिणामी, सीमाशुल्क वाद मिटतील, खरेदी-विक्री सोपी होईल आणि बँकांकडून कर्ज मंजुरीची प्रक्रियादेखील जलदगतीने पार पडेल.
सध्या राज्यातील काही तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून लवकरच त्याला सुरुवात होणार आहे. अनेक वेळा एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक खातेदार असतात, त्यामुळे त्या जमिनीचे पोटहिस्से तयार करण्यात येतात.
पोट हिस्सेदारांना मिळणार स्वतंत्र अधिकार:
सातबाऱ्यावरील पोटहिस्सेदार जर जमीन विकू इच्छित असेल, तर त्यासाठी इतर खातेदारांची संमती घ्यावी लागते. जर कोणाला जमिनीची मोजणी करायची असेल, तर सर्व पोटहिस्सेदारांची मान्यता आवश्यक असते. संमतीच्या अटींमुळे अनेक वेळा जमीन व्यवहार अडकतात आणि न्यायालयात प्रकरणे दाखल होतात.
डिजिटल नोंदी केल्या जाणार:
राज्यातील काही तालुक्यांतील प्रत्येक गावात प्रायोगिक तत्त्वावर सातबाराच्या पोट हिस्स्यांची मोजणी केली जाईल. प्रत्येक सर्व्हे क्रमांकाचा स्वतंत्र (Separate Land MAP for each Survey Number) नकाशा तयार केला जाईल. या नकाशांच्या आधारे भूमि अभिलेख विभागामार्फत सातबारा उताऱ्यात सुधारणा केली जाईल आणि डिजिटल नोंदी अद्ययावत केल्या जातील.
याचा फायदा काय होणार?
सातबारा उताऱ्यासोबत नकाशा उपलब्ध झाल्याने जमिनीचे सीमा विवाद समाप्त होतील. जमीन खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल. सातबारा उताऱ्यातील पोटहिस्सेदारांना इतर खातेदारांची संमती न घेता जमीन व्यवहार करण्याची मुभा मिळेल. बँकेकडून कर्ज मिळण्यास अधिक सोपी प्रक्रिया होईल.
“प्रत्येक सर्व्हे क्रमांकानुसार (Separate Land MAP for each Survey Number) नकाशा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यामुळे गावातील जमीनमालकांची स्पष्टता वाढेल आणि जमीन क्षेत्रही निश्चित होईल. हे मोठे काम असून, लवकरच त्याला सुरुवात होईल.
पुढील लेख देखील वाचा!
- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा (Satbara Utara ७/१२) ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर!
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
- सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाच्या बाबी!
- तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
- डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
- डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर !
- सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
- जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
- जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
- जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
- जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
- 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
- सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
- सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!