घरबसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (ई-केवायसी) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. शासनाच्या निर्देशानुसार, लाभार्थ्यांचे ई-केवायसी (Ration Card eKYC) करणे बंधनकारक आहे. त्यासाठी रास्तभाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे मोफत ई-केवायसी सेवा उपलब्ध आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आता शासनाने “मेरा ई-केवायसी” (Mera E-KYC) मोबाइल ॲप कार्यरत केले आहे. त्यामुळे लाभार्थी रास्तभाव दुकानात न जाता घरबसल्या काही मिनिटांतच स्वतःचे व आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन ई-केवायसी का आवश्यक आहे?
शिधापत्रिकेसोबत आधार क्रमांक संलग्न असल्याची तसेच शिधापत्रिकेतील व्यक्ती खरी असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी (Ration Card eKYC) अनिवार्य आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी पूर्ण न केल्यास शिधापत्रिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (ई-केवायसी) करण्याची प्रोसेस ! Ration Card eKYC:
घरबसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (Ration Card eKYC) (ई-केवायसी) करण्यासाठी मेरा ई-केवायसी मोबाइल ॲप (Mera E-KYC App) आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा गुगल प्लेस्टोअर वर “Mera E-KYC” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे.
डाउनलोड झाल्यानंतर कोणता एर्रोर प्रॉब्लेम येईल त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये अजून एक ॲप असणे गरजेचे आहे ते म्हणजे “आधार फेस आरडी सेवा ॲप” AadhaarFaceRD हे ॲप डाउनलोड करून ठेवायचे आहे.
आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा गुगल प्लेस्टोअर वर “AadhaarFaceRD” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे पुन्हा मेरा ई-केवायसी मोबाइल ॲप (Mera E-KYC App) ओपन करायचे आहे.
मेरा ई-केवायसी (Mera E-KYC App) ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपले राज्य निवडून Verify Location वर क्लिक करा.

पुढे आपला आधार क्रमांक टाकून Generate OTP वर क्लिक करा, त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा. माहिती सत्यापित करून सबमिट करा.

“फेस ई-केवायसी” पर्यायावर क्लिक करा आणि सेल्फी कॅमेरा सुरू झाल्यावर डोळे बंद-उघडा. चेहरा स्कॅन होताच ई-केवायसी (Ration Card eKYC) प्रक्रिया पूर्ण होईल. यशस्वी ई-केवायसी (Ration Card eKYC) नंतर मेसेज मिळेल आणि खात्री करता येईल. ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिका सुविधांवर परिणाम होऊ शकतो.
तसेच काही अडचण असल्यास: आपल्या रास्तभाव दुकान किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा. वेळेत ई-केवायसी करून तुमच्या धान्य हक्काची खात्री करा!
संपर्क: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टोल फ्री क्रमांक 1800-22-4950 व 1967, ई-मेल: helpline.mhpds@gov.in
या लेखात, आम्ही घरबसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (Ration Card eKYC – ई-केवायसी) कशी करायची? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- रेशन कार्ड आधार प्रमाणीकरनाचे (Ration Card eKYC) स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस!
- रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस !
- रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे?
- रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ePOS मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय !
- नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत ‘Mera Ration’ अॅप लाँच केले; आता देशामध्ये कोणत्याही राज्यातून रेशन मिळणार !
- रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- शिधापत्रिका रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका !
- अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत !
- एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना
- शिधापत्रिका धारकांच्या लाभार्थी संख्येत वाढ – नवीन शासन निर्णय जारी
- एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी आता रोख रक्कम; सुधारित योजना !
- पांढरे रेशन कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !
- घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ!
- रेशनकार्ड विषयक सेवांकरीता ऑनलाईन अर्ज करा !
- नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!