रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण या लेखामध्ये रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

रेशनिंगचे नियम, माहिती आणि आपले हक्क:

1) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.

2) स्वस्त धान्य दुकानामध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा काही नियम नाही.

3) स्वस्त धान्य दुकानामध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे.कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

4) दुकानदाराला रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही.

5) स्वस्त धान्य दुकानामध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक असले पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद,रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भव व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.

6) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य जर आपण मागील महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.
स्वस्त धान्य दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास चालू असलेच पाहिजे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी चालू असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे तारीख व वेळेसहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. तसेच त्याची सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

7) प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.

8) स्वस्त धान्य दुकानामध्ये आपल्याला ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.

9) स्वस्त धान्य दुकानामध्ये रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. त्याचा हप्ता बुडत नाही.

10) जर वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धमकी दाखवत, तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्हा म्हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्या, की स्वस्त धान्य दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

11) स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती नेमलेली असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर नजर ठेऊ शकते तसेच दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्य सचिव असतो.

12) आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन जे रेशन घेतो त्याची रेशन दुकानदार कधीकधी पावती मात्र देत नाही. म्हणुन महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

13) आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. तसेच या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

हेही वाचा – आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घ्या

14) रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

15) रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे.

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे?

रेशनदुकानदारा याबाबत तक्रार असल्यास खालील वेबसाईट, हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील सर्व वेबसाईट ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करता येईल.व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-49501967 तसेच ई-मेल: [email protected] पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा – रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

3 thoughts on “रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

 • October 27, 2021 at 8:46 pm
  Permalink

  रॉकेल बंद झाले कि

  Reply
 • December 29, 2022 at 11:47 pm
  Permalink

  महोदय, मी संतोष रामचंद्र कांबळे रा. कुर्डुवाडी. ता. माढा. जिल्हा सोलापूर. येथे राहत असून मला दिवाळी पासुन रेशनिंग देण्यात आले नाही. मी अपंग♿ आहे. मा. व्हि. व्हि. काशीद मला रेशनिंग देत नाही. मला सिजोफेनिया हा आजार आहे. तरी आपणास विनंती🙏😊 केली आहे. SRC NO-272022907215 हा आहे. तरी कृपया😫🙏🙏मला योग्य न्याय⚖️ मिळावा. व रेशनिंग देण्यात यावे. हि आपणास विनंती🙏😊 आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.