मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 जाहीर; मोबाईलवरून नाव तपासा एका मिनिटात!
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुनरीक्षणापूर्वी असलेल्या एकूण मतदारांपैकी तब्बल २ कोटींहून अधिक मतदारांची नावे या प्रारूप यादीत समाविष्ट नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी तुमचे नाव मतदार यादीत सुरक्षित आहे की वगळले गेले आहे, हे तातडीने तपासणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 (SIR Draft Voter List 2026) अंतर्गत आपले नाव ऑनलाईन कसे शोधायचे, नाव वगळले असल्यास काय करावे, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 – SIR Draft Voter List 2026:
भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमधील मतदार याद्यांची पडताळणी करण्यात आली.
पुनरीक्षणापूर्वी महाराष्ट्रात एकूण ९,७८,५४,०४९ मतदार नोंदणीकृत होते.
सध्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये ७,७१,६५,५६२ (७८.८६%) मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये ३,९५,८९,९०५ पुरुष, ३,७५,७२,५७० महिला आणि ३,०८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
तब्बल २ कोटी मतदारांची नावे यादीत का नाहीत?
प्रारूप यादीनुसार राज्यातील २,०६,८८,४८७ (२१.१४%) मतदारांची नावे गणना प्रपत्र प्राप्त न झाल्यामुळे यादीत आलेली नाहीत. प्रशासनाने यासाठी पुढील प्रमुख ५ कारणे (ASDDDO) स्पष्ट केली आहेत:
पत्यावर गैरहजर असणे: प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान मतदार दिलेल्या पत्त्यावर न सापडणे.
स्थलांतर: मतदार मूळ वास्तव्याच्या ठिकाणाहून कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले असणे.
मयत मतदार: संबंधित मतदाराचा मृत्यू झालेला असणे.
दुबार नोंदणी: एकापेक्षा जास्त ठिकाणी अथवा दोन वेगवेगळ्या प्रभागांत नाव नोंदणी असणे.
प्रपत्र देण्यास नकार: मतदारांनी गणना प्रपत्र भरून देण्यास नकार देणे किंवा उपलब्ध न होणे.
मोबाईलवरून मतदार यादीत नाव कसे तपासायचे? SIR Draft Voter List 2026:
तुमचे नाव यादीत आहे की नाही हे शोधण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला (voters.eci.gov.in) भेट द्या.
होमपेजवर “Download Electoral Roll” या पर्यायावर क्लिक करा.
- भारतीय निवडणूक आयोगा वेबसाईटच्या Electoral Roll मध्ये मतदार यादी (SIR Draft Voter List 2026) पाहण्यासाठी तुम्हाला आपले राज्य, जिल्हा, SIR Draft Voter List 2026, आपली भाषा निवडून मग कॅप्चा टाकायचा आहे.
त्यानंतर आपल्या विभाग निवडून डाउनलोड वर क्लिक करा, मग तुमच्यासमोर तुमच्या गावाची/विभागाची मतदार यादी (SIR Draft Voter List 2026) फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता.
तुमचे नाव स्क्रीनवर दिसेल. तेथून तुम्ही तुमची माहिती असलेली स्लिप किंवा पूर्ण प्रभागाची SIR Draft Voter List 2026 PDF डाऊनलोड करू शकता.
नाव नसेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर काय करावे?
जर प्रारूप (SIR Draft Voter List 2026) यादीत तुमचे नाव नसेल, पत्ता चुकला असेल किंवा नवीन नाव जोडायचे असेल, तर खालील फॉर्मचा वापर करा:
Form 6 (नवीन मतदार नोंदणी): ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही किंवा ज्यांचे वय ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे, ते नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म ६ भरू शकतात.
Form 7 (नाव वगळणे किंवा आक्षेप): मतदार यादीतील एखाद्या चुकीच्या नावावर किंवा दुबार/मयत व्यक्तीच्या नावावर आक्षेप नोंदवण्यासाठी फॉर्म ७ चा वापर केला जातो.
Form 8 (माहिती दुरुस्ती व स्थलांतर): नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग किंवा छायाचित्र दुरुस्त करण्यासाठी तसेच पत्ता बदलण्यासाठी फॉर्म ८ भरावा.
महत्त्वाची सूचना: मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती करताना चुकीची माहिती अथवा खोटी घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार १ वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड होऊ शकतो.
महत्त्वाच्या तारखा व वेळापत्रक
| तपशील / टप्पा | मुदत / दिनांक |
| प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी | ३१ ऑगस्ट २०२६ |
| दावे व हरकती नोंदवण्याचा कालावधी | ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ |
| दावे व हरकतींवर निर्णय व पडताळणी | ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ |
| अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची तारीख | ४ नोव्हेंबर २०२६ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. प्रारूप मतदार यादीत नाव नसेल तर काय करावे?
जर तुमचे नाव प्रारूप SIR Draft Voter List 2026 यादीत नसेल, तर लगेच Voters Service Portal वर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह Form 6 ऑनलाईन भरून नवीन नाव नोंदणीसाठी अर्ज करा.
२. दावे आणि हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
३. अंतिम मतदार यादी कधी जाहीर होणार आहे?
सर्व दावे व हरकतींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
४. मतदार यादीतील पत्ता किंवा नावात बदल कसा करावा?
नाव, वय किंवा पत्ता दुरुस्तीसाठी Voters Portal वर जाऊन Form 8 भरावा लागतो.
लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे. शासनाने दिलेली ३० सप्टेंबर २०२६ ची मुदत संपण्यापूर्वीच प्रत्येक नागरिकाने मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 (SIR Draft Voter List 2026) मध्ये स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नाव तपासून घ्यावे आणि काही त्रुटी असल्यास वेळेत अर्ज करावा. ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा.
या लेखात, आम्ही मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 (SIR Draft Voter List 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख वाचा !
- मतदार पडताळणी 2026 बाबत पडणारे प्रश्न आणि उत्तरे | संपूर्ण माहिती!
- मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026: ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया | संपूर्ण माहिती!
- मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक घरबसल्या ऑनलाइन अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया!
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
- स्थानिक स्वराज्य संस्था मतदार यादी 2026 – ऑनलाईन पाहा तुमचं नाव!
- विधानसभा मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध !
- मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- आचारसंहितेचे (Aachar Sanhita) उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

