एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार !
राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून, त्याचा फायदा प्रवाशांबरोबरच महामंडळालाही होणार आहे.
एसटीच्या पुणे विभागातील सर्व आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.
पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका होणार आहे. महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रा.प. महामंडळात नवीन अँड्रॉइड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. रा.प. महामंडळातही रोकड विरहित (Cashless) सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रा.प. महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये युपीआय QR Code द्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे. याच्या पुढील टप्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांसाठी हेल्पलाइन:
सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क करावा. तसेच ई-मेल wecare@aritelbank.com येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत.
हेही वाचा – एसटीच्या बसस्थानकांवर जादा दराने चहा-नाश्ता, ‘नाथजल’ची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!