वृत्त विशेषजिल्हा परिषदनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहिला व बाल विकास विभागसरकारी कामेसरकारी योजना

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहे.

योजनेचा लाभ कधीपासून मिळणार?

“लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव विधीमंडळाचं अधिवेशन झाल्याच्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल.

पात्रतेचे निकष 

 • लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे.
 • या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.
 • अशी ही एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे.
 • राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाभार्थी निवड कशी 

 • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
 • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
 • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
 • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
 • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
 • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कुठे व कसा करायचा?

 • तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा नमुना खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉरमॅट देण्यात आला आहे. एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता.
 • यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
 • अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

 • लाभार्थीचा जन्माचा दाखला
 • कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
 • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
 • पालकाचे आधार कार्ड
 • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
 • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत),
 • मतदान ओळखपत्र
 • शाळेचा दाखला
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

अर्ज केल्यानंतर पुढे काय?

 • अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.
 • त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
 • प्रशासकीय यंत्रणेनं 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे.
 • एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

लेक लाडकी योजनेबाबत शासन निर्णय व अर्ज नमुना: लेक लाडकी योजनेबाबत शासन निर्णय व अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.